देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 24 मे : बहुजन कष्टकरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेची सिद्धार्थ नगर परिसरामध्ये निर्मिती करणारे फुले शाहू आंबेडकरी साठे चळवळीतील आधारवड कालकथित दादासाहेब गायकवाड उर्फ दा. भि. गायकवाड गुरुजी यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळा सिद्धार्थनगर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, संस्थेचे विश्वस्त प्रा. भीमराव पगारे, राहुल पाटेकर, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पंचशील विद्या मंदिरचे खजिनदार प्राध्यापक जयंत गायकवाड, पत्रकार महेश भोसले, कामगार नेते प्रवीण सोनवणे, पंचशील विद्यामंदिर चे मुख्याध्यापक शेखर उंडे सर, यु. एस. साबळे, शिरसाठ मॅडम आदी उपस्थित होते.
यावेळी कामगार नेते प्रवीण सोनवणे यांनी प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशा पंचशील विद्यामंदिर येथून झाला. कामगारांचे बहुजनांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याबाबत कालकथित दा. भि.गायकवाड गुरुजी यांनी मला मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग आज मला कामगारांचे प्रश्न सोडवताना निश्चित होत आहे. अशा भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा