देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 7 मार्च : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी रोहीत अनिल पवार वय- 29 वर्षे, रा. कान्होपात्रानगर, जामखेड, ता. जामखेड हे दिनांक 18/12/2025 रोजी न्यु कावेरी हॉटेल, जामखेड बीड रोड येथे असतांन आरोपी 1) शुभम शहाराम लोखंडे, 2) उल्हास विलास माने उर्फ वस्ताद 3) अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे 4) अर्शद अमीन सय्यद व अनोळखी 6 ते 7 यांनी गैरकायद्याचे मंडळी एकत्र जमवुन फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने आरोपीतांनी पिस्टलने फायर करुन गंभीर जखमी केले व हॉटेलमधील सामानाची व फॉर्च्युनर गाडीचे सत्तुर व लाकडी दांड्याने तोडफोड करुन नुकसान केले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 324(5), 351(2(3)) सह आर्म ऍ़क्ट 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला होता. दिनांक 06/03/2026 रोजी श्री प्रविणचंद लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग कर्जत यांना नमुद गुन्ह्यातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा खर्डा परिसरामध्ये आलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहिती तात्काळ मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना कळविली असता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व जामखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेश दिले.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सपोनि/ हरिष भोये, पोउपनि/ महादेव गुट्टे, समीर अभंग, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, ह्रदय घोडके, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, रिचर्ड गायकवाड, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डिले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोउपनि/ किशोर गावडे, पुष्कर कडु, पोलीस अंमलदार प्रविण इंगळे, रविंद्र वाघ, देवीदास पळसे, कुलदीप घोळवे, दत्तात्रय बेल्हेकर, आकाश शेवाळे, प्रताप देवकाते, मनोज लातुरकर यांचे पथक तयार करुन त्यांना सदर आरोपीचा पुर्वइतिहास समजावुन सांगुन पथकास रवाना करण्यात आले.
वर नमुद पथकाने तात्काळ खर्डा गावचे शिवारात जावुन आरोपीची व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढुन सापळा रचुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्यांचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे वय- 24 वर्षे रा. पाटोदा गरड, ता. जामखेड असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने दिनांक 18/12/2025 रोजी तो तसेच त्याचे साथीदार 1) शुभम शहाराम लोखंडे, 2) उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, 3) अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे, 4) अर्शद अमीन सय्यद व अनोळखी 6 ते 7 यांनी मिळुन फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने पिस्टलने फायर करुन गंभीर जखमी केले व हॉटेलमधील सामानाची व फॉर्च्युनर गाडीची सत्तुर व लाकडी दांड्याने तोडफोड करुन नुकसान केले असल्याची कबुली दिली आहे.
आरोपी नामे अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा रेकार्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 जामखेड, जि. अहिल्यानगर 96/2018 भादवि कलम 143,147,148
2 जामखेड, जि. अहिल्यानगर 75/2018 भादवि कलम 302
3 जामखेड, जि. अहिल्यानगर 55/2018 भादवि कलम 307,308,324 आर्म ऍ़क्ट 3/25
4 जामखेड, जि. अहिल्यानगर 492/2022 भादवि कलम 307,323,324
5 जामखेड, जि. अहिल्यानगर 122/2023 भादवि कलम 143,147,148, 385
6 जामखेड, जि. अहिल्यानगर 123/2023 भादवि कलम 395,323,427,504,506
7 जामखेड, जि. अहिल्यानगर 101/2024 भादवि कलम 307,34,504 आर्म ऍ़क्ट 3/25
8 जामखेड, जि. अहिल्यानगर 534/2025 बी.एन.एस.कलम 351(2),352
9 जामखेड, जि. अहिल्यानगर 546/2025 बी.एन.एस.कलम 308(2), 308(5), आर्म ऍ़क्ट 4/25
10 जामखेड, जि. अहिल्यानगर 669/2025 बी.एन.एस.क.109,189(2),190,351(2)आर्म ऍ़क्ट 3/25
ताब्यातील आरोपी गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व श्री प्रविणचंद लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व जामखेड पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा