कौतुकास्पद

चहा पाजण्याच्या बहाण्याने लुटणारा आरोपी जेरबंद; तीन लाखांची रक्कम फिर्यादीला परत

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर :दि. 14 मार्च : चहा पाजण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीची तीन लाख रुपये रोकड लुटणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक करून लुटलेली रक्कम हस्तगत केली आहे. जप्त केलेली तीन लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी मूळ फिर्यादीकडे सुपूर्द केली आहे.
बजीराव काशीनाथ पोकळे (वय ६५, रा. कौठे यामाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर येथे आले होते. त्यावेळी ओळखीचा लाला उर्फ लालासाहेब सुद्रिक याने त्यांना चहा पाजण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेले आणि त्यांच्या बॅगेतील तीन लाख रुपयांची रोकड हिसकावून फरार झाला होता. या घटनेची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष बनकर, राहुल शिंदे, पोलीस अंमलदार सुरज कदम, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, शिरीष तरटे यांच्या पथकाने तपास करत आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केले. आरोपीकडून लुटलेली तीन लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून ती रक्कम पोलिसांनी फिर्यादीकडे परत दिली आहे.
या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे