देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 15 मार्च : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, खंडणी विरोधी पथक -02 गुन्हे शाखा, पुणे शहर चे अधिकारी यांनी श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना, कोंढवा पोलीस स्टेशन जि. पुणे गु. र. नं. 184/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 55, 61, 3(5), आर्म ऍ़क्ट 3/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनिय कमल 37(1)(3) 135 प्रमाणे अग्नीशस्त्रसह खुनाचा कट केले बाबत गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यातील आरोपी ओंकार दयानंद पवार हा अहिल्यानगर परिसरात आल्याची माहिती देवुन सदर आरोपीस ताब्यात घेणेबाबत कळविले होते.
त्यानंतर पो. नि. किरणकुमार कबाडी यांनी प्राप्त माहिती श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना कळविले असता त्यांनी योग्य ती कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, विष्णु भागवत, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, योगेश कर्डीले, प्रशांत जाधव महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन एम.आय.डी.सी. अहिल्यानगर येथे जावुन आरोपीचे शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वरील पथकाने एम.आय.डी.सी. परिसरात आरोपीचे शोध घेत असतांना शिवाजीनगर अमरदीप पेट्रोल पंपाशेजारी एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. तेव्हा पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव ओंकार दयानंद पवार वय- 24 वर्षे रा. गुलटेकडी पुणे असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसम नामे ओंकार दयानंद पवार वय- 24 वर्षे रा. गुलटेकडी पुणे याचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने वरील गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपी यास खंडणी विरोधी पथक -02 गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट 05, पुणे शहर हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा