देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. १५ – महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभासाठी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे राहुरी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा