आरोग्य व शिक्षण
पंचशील विद्या मंदिरमध्ये पाठयपुस्तके,गुलाबपुष्प देत विध्यार्थ्यांचे केले स्वागत!
अहमदनगर दि. 15 जून (प्रतिनिधी )
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच संस्थापक दा. भि. गायकवाड गुरूजी यांनी स्थापन केलेल्या पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस तसेच पहिली च्या विद्यार्थी यांचा पहिला दिवस त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करून बाकीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका चे वाटप करण्यात आले यावेळी युवा नेते आयु सुरेश भाऊ बनसोडे , अध्यक्ष सुमेध गायकवाड , विश्वस्त सारंग पाटेकर , विश्वस्त भीमराव पगारे सर , मुख्याध्यापक उकर्ड सर , आयु. उंडे सर , श्रीमती. गोसावी मॅडम . श्रीमती . वांगणे मॅडम , श्रीमती . शिरसाठ मॅडम , आयु . साबळे सर , श्रीमती . तिवारी मॅडम व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.