अहमदनगर दि. 16 जून (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 12/06/24 रोजी फिर्यादी श्री. गणपत पोपट कायगुडे वय 45, रा. कायगुडेवस्ती, राशिन, ता. कर्जत हे कुटूंबियासह बाहेरगांवी गेलेले असतांना त्यांचे वयस्कर आई वडील घरी होते. त्यावेळी त्यांचे नात्यातील प्रशांत बाचकर हा वडीलांना औषध देण्यासाठी आला असता त्याने घरातील 52,500/- रुपये किंमतीचे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले बाबत कर्जत पो.स्टे.गु.र.नं. 411/2024 भादविक 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 15/06/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक आरोपीची तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत गुन्ह्यातील आरोपी नामे प्रशांत बाचकर रा. सरडेवाडी, ता. इंदापुर, जिल्हा पुणे हा त्याचे राहते घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) प्रशांत मानसिंग बाचकर वय 27, रा. सरडेवाडी, ता. इंदापुर, जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे सांगुन गुन्ह्यात चोरी केलेला काही दागिने CAPRI LOANS येथे गोल्ड लोन केले आहे असे सांगितले. त्यावेळी पथकाने आरोपीची
अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 1,20,000/- रु किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व उर्वरीत दागिणे गोल्ड लोन केल्याची पावती मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेवुन कर्जत पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील तपास कर्जत पो.स्टे. करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा