देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्हयात फेब्रुवारी 2025 या महिन्यामध्ये शेंडी, ता.अहिल्यानगर व वांजोळी ता.नेवासा येथील शेतवस्तीवर 8 आरोपीतांनी केलेल्या दरोडयाच्या गुन्हयांबाबत 1) एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. 109/2025 बीएनएस कलम 311 व 2) सोनई पोलीस स्टेशन गुरनं 40/2025 बीएनएस कलम 309 (6) सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून नमूद वर एमआयडीसी व सोनई पोलीस स्टेशनला दाखल दरोडयाच्या गुन्हयांत यापुर्वी 1) तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले 2) विकी संजय काळे, 3) सुशांत सुरेश भोसले असे आरोपी ताब्यात घेऊन त्यांना गुन्हयाचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले होते.गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी हे गुन्हा केलेपासुन फरार झालेले होते.
मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना गंभीर स्वरूपाच्या दरोडयाच्या गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन, कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर व प्रशांत राठोड अशाचे पथक तयार करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 05/03/2025 रोजी पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पारनेर पोलीस स्टेशन गुरनं 109/2025 व सोनई पोलीस स्टेशन गुरनं 40/2025 या दोन्ही गुन्हयांतील निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना तपेश किरण भोसले, रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड हा त्याचे राहते घरी असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने आरोपीचे राहते घरी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) तपेश किरण भोसले, वय 32, रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले व त्याचे साथीदारासोबत शेंडी व वांजोळी येथे गुन्हे केल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा