गुन्हेगारी

कत्तलीसाठी आणलेल्या 10 गोवंशीय जनावरांची सुटका, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर:दि. 20 डिसेंबर: मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, दिपक घाटकर, अतुल लोटके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, अमोल आजबे, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणाची व अवैध कत्तलखान्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 20/12/2025 रोजी पहाटे नमुद पथक सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास चांदा गावामध्ये मस्जिदजवळ इसम नामे उबेद आबुजा शेख व गौस मोबीन कुरेशी, दोघे रा. चांदा ता.नेवसा हे गोवंशीय जातीचे जिवंत जानावरे कत्तल करण्याचे उद्देशाने विना चारापाण्याची बांधुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चांदा गावात जावुन खात्री करता मस्जिदजवळ गोवंशीय जनावरे बांधलेले दिसली. तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकण्याकरीता जात असतांना त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते तेथुन पळुन गेले आहे. पळुन गेलेल्या इसमांबाबत तेथे असलेल्या लोकांकडे विचारपुस करता त्यांनी त्यांचे नांवे 1) उबेद आबुजा शेख (फरार), 2) गौस मोबीन कुरेशी (फरार) दोघे रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले आहे.
सदर ठिकाणीवरुन 10 गोवंशीय जिवंत जनावरे असा एकुण 2,20,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पळुन गेलेल्या आरोपीविरुध्द पोकॉ/1191 अमोल श्रीरंग आजबे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 460/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क. 5(अ),(ब), 9(ब), प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे