कौतुकास्पद

“जय जवान!जय किसान!! जय संविधान!!!” या मूलमंत्रावर आधारित “संविधान प्रतिष्ठानच्या” वतीने मानवतेच्या हेतूने ऊसतोड मजुरांना उबदार कपड्यांचे वाटप! जिल्ह्यातील पहिला स्तुत्य उपक्रम!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर ( नांदगाव शिंगवे ) अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदगाव शिंगवे नाईक येथील प्रगतशील शेतकरी प्रा. डी आर जाधव यांच्या संकल्पनेतून “जय जवान! जय किसान!! जय संविधान!!!” या मूलमंत्र्यावर आधारित संविधान प्रतिष्ठानच्या वतीने समता आणि मानवतेच्या उदात्त हेतूने शेतातील ऊसतोड मजुरांना थंडीच्या दिवसांमध्ये नवीन उद्धार कपड्यांचे वाटप यावेळी विश्वासराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या ऊबदार कपड्यांचे वाटप केले. यावेळी एम.डी.सोनवणे, एकनाथराव जाधव, राजेंद्र अडसुरे, दोड पाटील, विलासराव सोनवणे, दिलीपराव मोरे, डी.आर.जाधव, हरीश शेळके, अमोल डोळस, संतोष मंचरे, आदी उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक करताना प्राध्यापक डी. आर.जाधव यांनी सांगितले की सर्व युगपुरुषांनी महामानवांनी आपल्याला महत्त्वाचा कानमंत्र दिलेला आहे “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” स्वातंत्र्य,समता, बंधुता, एकता, न्याय, आणि मानवता ही मूल्ये महामानवांनी आपल्या मनावर उबवलेली या महामानवांचे महान कार्य येणाऱ्या पिढ्यांना समजावेत म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त त्यांना आपण अभिवादन करत असतो. या महामानवांना अभिवादन करताना समाजातील प्रत्येकाला काही प्रश्न पडले पाहिजेत. उदा. मानवांना अपेक्षित असलेला भारत देश आपण घडवू शकलो का? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती आपण करू शकलो का? जात धर्म पंथ संप्रदाय वंश या पलीकडे जाऊन भारतीय संविधानाने आपल्याला नवीन दृष्टी दिली ती नवी दृष्टी आपण अंगीकारली आहे का? आज तरी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाकडे नाहीत. यावेळी बोलताना जाधव म्हणाले ज्या दानशूर लोकांमुळे आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या ऊसतोड मजुरांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे देऊ शकलो. अशा दानशूर लोकांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मंगल कामना त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील या स्तुत्य उपक्रमाबद्दल ऊसतोड कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की,आमच्या वीस वर्षाच्या काळात अशा प्रकारची माणुसकी आणि आपलेपणा आम्ही पहिल्यांदाच अनुभवत आहोत. आम्ही आमच्या मुलांना नक्कीच चांगले शिक्षण देऊ संविधान समजून घेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो यावेळी बाबासाहेब बटुळे, राजू रोकडे, गोवर्धन बटुळे, अशोक कराड, धर्मराज बटुळे, शितल रोकडे,विशाल कराड, रंजना बटुळे, नितीन कराड, मंदा कराड,उषा बटुळे, आधी ऊसतोड मजुरांना उबदार कपड्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संविधान प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे