ब्रेकिंग

पाथर्डी तालुक्यात खाकीचा धाक झाला कमी तरुणाला बंदूकीने जीवे मारण्याची धमकी देत नऊ जणांच्या टोळीने केला जीवघेणा हल्ला! पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाथर्डी पोलिसांना अद्यापही आरोपी सापडेनात

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर : दि. 28 मे :पाथर्डी तालुक्यात पोलिसांच्या खाकीचा धाक कमी होत असल्याचा प्रत्यय घडणाऱ्या गुन्हेगारीच्यामुळे घटनांमुळे नागरिकांना येतो आहे.

पाथर्डी तालुक्यातील शेवगाव रस्त्यावर तरुणाला बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देत नऊ जणांच्या टोळीने कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्यानी मारहान केल्याची घटना रविवार दि. 25 मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत मंगळवार दि. 26 मे रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मात्र पाथर्डी पोलिसांना अजूनही आरोपी सापडले नाहीत.

तुषार चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत शुभांगी साईनाथ चव्हाण (वय 20) रा. शेवगाव रोड, पाथर्डी हिने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे.
तरुणी शुभांगी चव्हाण हिने फिर्यादित म्हटले आहे, मी वरील ठिकाणी राहणारी असून आई वाळू अमोल काळे, आजी इंदुबाई आब्बास चव्हाण कुटूंबामध्ये एकत्र राहतो, माझे पती साईनाथ चव्हाण यांच्याकडे मी नांदत नसून मी माझी आई व आजीकडे राहते. सोमवार दि. 25 मे रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोड, पाथर्डी हॉटेल मधुबन जवळ असलेल्या समर्थ किराणा दुकानात किराणा घेऊन दुकानाच्या बाहेर आले असता, 1) पप्पू लाल्या भोसले 2) गुंग्या लाल्या भोसले 3) विशाल हंबड्या काळे 4) गुड्डी हंबड्या काळे सर्व राहणार सर्व रा. बाभळगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर 5) प्रल्हाद गहिनीनाथ मुरकुटे रा. आष्टी ता. आष्टी जि. बीड इतर 3 ते 4 अनोळखी इसम एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी घेऊन शेवगा कडून आले.व व मला पप्पू लाल्या भोसले, विशाल हंबड्या काळे, गुड्डी हंबड्या काळे हाताला धरून ओढून घेऊन जाऊ लागले. यावेळी माझ्या मामाचा मुलगा तुषार आस्तान चव्हाण तो मला सोडवण्यासाठी मध्ये पडला असता त्यास पप्पू लाल्या भोसले, विशाल हंबड्या काळे यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने डोक्यामध्ये मारून जखमी केले. इतर आरोपींनी मला व माझ्या मामाचा मुलगा तुषार याला लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करत मारहाण करून बंदुकीने जीव मारण्याची धमकी दिली. तसेच मला किडनॅप करून तुला विकून टाकतो. अशी धमकी दिली. मामाचा मुलगा तुषार यास या भांडणांमध्ये जखमी झाल्याने पोलीस ठाण्याचे यांनी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे पाठविले. तेथे डॉक्टरांनी उपचार करून जिल्हा रुग्णालय येथे पाठवले. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत असून इतक्या गंभीरघटनेतील आरोपी पाथर्डी पोलिसांना का सापडत नाहीत? अशा चर्चा पाथर्डी तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे