गुन्हेगारीब्रेकिंग

मौजमजा करण्यासाठी मोटार सायकल चोरणा-या चोरट्याकडुन ६,६०,०००/- रु किं.च्या १२ मोटार सायकल जप्त तोफखाना पोलीस स्टेशनची कामगिरी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 4 जून : तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसे-दिवस मोटार सायकलच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. जगदिश भांबळ यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रेट्रोलिंग करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे निष्पन्न करुन मोटार सायकल हस्तगत करणायाबाबत गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांच्या पथकाला तोंडी आदेश दिल्याने लागलीच आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व पोलीस अंमलदार हे पो.स्टे मध्ये पेट्रोलिंग करताना एका इसमाकडे विना नंबरची मोटार सायकलवर मिळुन आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो पळुन जाण्याच्या तयारीत असतानाच त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव कृष्णा उमेश अंतरकर, वय २९ वर्षे, रा.शिवशक्ती नगर, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर* असे सांगितले, त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने अहिल्यानगर शहरातुन आज पावेतो अनेक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन त्याच्याकडुन खालील वर्णनाचे व किंमतीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तोफखाना पो.स्टे.चे ०४ गुन्हे व कोतवाली पो.स्टे.चा ०१ गुन्हा उघड झाला आहे. इतर मोटर सायकल चोरी बाबत अभिलेख तपासणी चालु आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची माहिती खालीलप्रमाणे,

अ.क्र
१)६०,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११ENL५B०१४१८, चेसी नंबर MBLHAW०२१L५B०१२६९असा असलेली जु.वा.कि.अ. (तोफखाना पो.स्टे गुन्हा रजि नं. ३४१/२०२६, बी.एन.एस.क.३०५ (ब) प्रमाणे मधील )

२)५०,०००/- रु कि.ची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EPH९६०५५६८, चेसी नंबर – MBLHAR०५९H९E३१२१९ असा असलेली जु.वा.कि. (तोफखाना पो. स्टे गुन्हा रजि नं. ३५०/२०२६, बी.एन.एस.क.३०५ (ब) प्रमाणे मधील )

३)५५,०००/- रु कि.ची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११ENAJHD३७०८६, चेसी नंबर – MBLHAR२३९JHE०००१२ असा असलेली जु.वा.कि.अ. (तोफखाना पो.स्टे गुन्हा रजि नं. ६०६/२०२५, बी.एन.एस.क.३०५ (ब) प्रमाणे मधील )

४)६०,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EPJFH०५५५३, चेसी नंबर MBLHAR०५८J५H०५६२२ असा असलेली जु.वा.कि. (कोतवाली पो.स्टे गुन्हा रजि नं. ५८/२०२५, बी.एन.एस. क. ३०५ (ब) प्रमाणे मधील )

५)४५,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EJG९८१९५६२, चेसी नंबर MBLHA११ATG९८४८३९६ असलेली जु.वा.कि. (तोफखाना पो. स्टे गुन्हा रजि नं. १०७४/२०२४, बी.एन.एस.क.३०५ (ब) प्रमाणे मधील)

६)६५,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EKG९A१२८१७, चेसी नंबर – MBHA११AZG९A१२९०७ असा असलेली जु.वा.कि.अ.

७)५५,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EKF९८०६४३८, चेसी नंबर – MBLH११AZF९८०६५२७ असा असलेली जु.वा.कि.अ.

८)४५,०००/- रु कि.ची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EKH९८०९००३, चेसी नंबर ज्ञ MBLHA११AZH९A२०६३१ असा असलेली जु.वा.कि.अ.

९)६०,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EFE९G३८९६७, चेसी नंबर – MBLHA११AEE९७०३८० असा असलेली जु.वा.कि.अ.

१०)५०,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EPH९८०६२५५, चेसी नंबर- MBLHAR०५०H९६२०४७० असा असलेली जु.वा.कि.अ.

११)५५,००० /- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११EYL५१०४७८१, चेसी नंबर – MBLHAW१२६८५३८३८१८ असा असलेली जु.वा.कि.अ.

१२)६०,०००/- रु किं.ची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली विना नंबरची, तिचा इंजिन नं – HA११ENH९८३००१२, चेसी नंबर – MBLHAR२३८H९D२३०२४असा असलेली जु.वा.कि.अ.

असा एकुण – ६,६०,०००/- (सहा लाख साठ हजार मात्र) मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

*सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. मुम्मका सुदर्शन सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री. वैभव कलुबमें, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. जगदीश भांबळ, तोफखाना पो.स्टे अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ नितिन उगलमुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सुधीर खाडे, पो.कॉ सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतिष शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, म.पो.ना जिजा खुडे, म.पो.कॉ कल्पना अवसरे, सर्व नेमणुक तोफखाना पो. स्टे, अहिल्यानगर यांनी केली असुन सदर गुन्ह्याच्या तांत्रिक तपासकामी दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ राहुल गुंन्डु, नितिन शिंदे, अरुण सांगळे यांनी योग्य ती मदत केली आहे*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे