देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 2 जून : किरकोळ भांडणाच्या कारणावरून बेलवंडी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून तानाजी लगड याच्यासह अनोळखी 15 जणांनी गवळी कुटुंबावर केला जीवघेणा सशस्त्रहल्ला केल्याची माहिती समोर आली असून जखमींवर शासकीय रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार सुरू याबाबत दिगंबर भाऊ गवळी यांनी दिलेल्या जबाबनुसार फिर्याद दाखल याबाबतचे सविस्तर माहिती अशी की,
दिगंबर भाऊ गवळी वय 38 धंदा – खाजगी नोकरी रा. वेठेकर वाडी कोळगाव ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर मो नं 94 22719637 समक्ष वार्ड क्रमांक 06 सिव्हिल हॉस्पिटल येथे औषधोपचार घेताना असताना जबाब लिहून देतो की, मी वरील ठिकाणी वडील भाऊ किसन गवळी, आई पार्वती गवळी, मुलगी अक्षरा असे एकत्र राहतो.
आमच्या शेजारी तानाजी बबन लगड हे त्याच्या कुटुंबासह राहतात.
दि. 31/05/2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास तानाजी लगड याने दारू पिऊन काही कारण नसताना मला शिवगाळ केली त्यामुळे मी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्याचा राग येऊन ताना
जी याने दि. 31/05/2026 रोजी साय 7.00 वा चे सुमा. माझी आई पार्वती व वडील किसन गवळी यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली होती त्यानंतर सदर घटना माझा भाऊ सोमनाथ गवळी या सांगितल्याने तो सुरत येथून आम्हाला भेटण्यासाठी गावी आला होता.
त्यानंतर आम्ही व तानाजी लगड व त्याचा भाऊ बिभीषण लगड असे आम्ही आपापसात वाद मिटवले होते.
दिनांक 01/06/2026 दु. 12.30 वा.चे सुमा. मी माझ्या कुटुंबासह आमचे घरी जेवण करत असताना 1) वैभव तानाजी लगड 2)तानाजी बबन लगड 3) बिबीशन बबन लगड 4)तात्या बबन लगड व बिबीशन लगड याचे दोन मुले, तात्या लगड याचे दोन मुले ( नाव माहित नाही ), भाऊ राजू वाळके रा.चांबुर्डी , विशाल पंधरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा व इतर दहा ते पंधरा अनोळखी लोक आमचे घरात येऊन आम्हाला घाण घाण शिव्या देऊ लागले त्यावेळी आम्ही शिवीगाळ का करता असे म्हणालो असता वैभव तानाजी लगड याने त्याच्या हातातील तलवार माझ्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच तानाजी लगड याने त्याच्या हातातील उलटी कुऱ्हाड माझ्या तोंडावर मारून मला दुखापत केली. त्यावेळी माझा भाऊ सोमनाथ हा मला सोडवण्यासाठी मध्ये आला असता
भाऊ सोमनाथ गवळी यास वैभव लगड याने तलवारीने त्याच्या डोक्यावरती वार केले.
माझी आई पार्वती व वडील भाऊ किसन गवळी यांना तात्या लगड व इतर लोकांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यावेळी भाऊ राजू वाळके याने त्याच्या हातातील मिरची पावडर ही आमचे डोळ्यात टाकली आहे.
त्यावेळी वैभव लगड याच्यासोबत आलेल्या लोकांनी आमच्या घरावर दगडफेक करून भाऊ सोमनाथ गवळी याची टाटा नेक्सन GJ 19 BJ 5603 हिचे नुकसान केले. सदर भांडणात माझी आई पार्वती गवळी यांच्या गळ्यातील दागिने गहाळ झाले आहेत. त्यानंतर मी डायल 112 ला कॉल केल्यानंतर वैभव लगड हा आम्हाला शिवीगाळ करून पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते सर्व पळून गेले.
म्हणून माझी 1) वैभव तानाजी लगड 2) तानाजी बबन लगड 3) बिबीशन बबन लगड 4) तात्या बबन लगड व बिबीशन लगड याचे दोन मुले, तात्या लगड याचे दोन मुले ( नाव माहित नाही ), भाऊ राजू वाळके रा. चांबुर्डी , विशाल पंधरकर रा पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा व इतर 10 ते 15 अनोळखी लोक यांच्याविरुद्ध फिर्याद आहे.
माझा वरील जबाब मी वाचून पाहिला तो मी पूर्ण शुद्धीवर असताना लिहून दिला असल्याचे जबाबात म्हटले आहे . याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात मेडिकल सर्टिफिकेट आल्यानंतर कोणता गुन्हा दाखल होणार याकडे श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा