देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. 30 मे : चंद्रकांत वाघचौरे आणि कास्ट्राईब संघटना यांचा जिल्ह्यामध्ये अतूट संबंध राहिला आहे. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हर्षल काकडे यांनी केले.
बांधकाम विभागाचे कनिष्ठ सहाय्यक चंद्रकांत वाघचौरे यांच्या सेवापुर्ती समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते.
यावेळी सुखदेव आंबेडकर, संगीता सप्तर्षी, कुलकर्णी मॅडम, निर्मला होडकर, स्नेहा कुलकर्णी, श्रीकांत टेमकर, श्रेयश घोरपडे, किरण कदम, रासकर, चंद्रशेखर ठाणगे, देशस्तंभ न्यूजचे महेश भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड, हराळ महाराज, विवेक विधाते, वाघचौरे यांच्या मातोश्री साखराबाई वाघचौरे, शशिकांत वाघचौरे, गोविंद वाघचौरे, सिद्धांत वाघचौरे, सुबोध वाघचौरे, विवेक वाघचौरे, गणेश राऊत
तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अभियंता काकडे म्हणाले, चंद्रकांत वाघचौरे हे वयोमानानुसार आज रिटायर्ड होत आहेत परंतु नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना कार्यालयात यावेच लागेल त्यांचा स्वभाव दुसऱ्याच्या अडीअडचणीत पाठीशी उभा राहून सहकार्य करण्याचा आहे.
मी ज्या वेळेस आजारी होतो. त्यावेळेस त्यांनी मला धीर देत माझ्या मेडिकल बिलांचा पाठपुरावा केला. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने चंद्रकांत वाघचौरे यांचा योग्य तो सन्मान करण्यात केला.
यावेळी सेवानिवृत्त चंद्रकांत वाघचौरे यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले माझ्या वीस वर्षाच्या सेवेमध्ये कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच माझी आई व व वाघचौरे कुटुंबातील माझे, बहीण, भाऊ यांनी मला नेहमी सहकार्य केले त्यांच्यामुळे मी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकलो. यावेळी ते अत्यंत भावनिक झाले होते. त्यांना सेवापूर्तीचा निरोप देतांना कार्यालयातील अधिकारी कर्मचारी भावनिक झाले होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा