गुन्हेगारी

वृध्द महिलेस धमकी देवुन घरफोडी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 1 डिसेंबर: प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 22/11/2025 रोजी रात्री 02/00 वा. चे सुमारास फिर्यादी श्री हौसाबाई कोंडाजी राहिंज वय- 50 वर्षे रा. रहिंजवाडी माळकुप ता. पारनेर हे त्यांचे घरामध्ये झोपलेले असतांना फिर्यादीस उठता बसता येत नसल्याने फिर्यादीची सुन इंदुबाई हिने घरास बाहेरुन कुलुप लावलेले होते. त्यानंतर कोणीतरी अज्ञात दोन चोरट्यांनी फिर्यादी झोपलेल्या घराचे कुलुप बाहेरुन तोडुन घरात येवुन फिर्यादीस हाताने दाबु धऱुन तु गप्प पडुन रहा असे म्हणुन काहीतरी वस्तुचा धाक दाखवुन तु आरडाओरड केला तर तुला जीवे ठार मारुन टाकु असा दम देवुन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेलेले आहे. सदर घरफोडीचे घटनेबाबत पारनेर पोलीस ठाणे गु.र.नं. 882/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 331(4), 305, 3(5) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.
वर नमुद सुचनेनुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन गुन्ह्यातील आरोपीचे तांत्रिक विश्लेषण व व्यवसायीक कौशल्य आधारे शोध घेत असतांना दिनांक 30/11/2025रोजी माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गणेश रमेश काकडे, रा. पेठ आंबेगाव, ता. मंचर, जि. पुणे हा त्याचे साथीदारासह केला असुन, तो सध्या नेप्ती नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) गणेश रमेश काकडे वय – 30 वर्षे रा. पेठ आंबेगाव, ता. मंचर, जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा मी व माझे साथीदार 2) अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले (फरार), 3) गंड्या अर्पण भोसले दोघे रा. घाणेगाव ता. पारनेर (फरार) अशांनी मिळुन केले असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता आरोपीचे सांगणे प्रमाणे सोन्याच्या धातुची मणी, कानातील कुडके, सोन्याची नथ असा एकुण 62,956/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच आरोपी नामे गणेश रमेश काकडे याचेकडे विश्वासात घेवुन आणखी गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे वरील साथीदारासह चाकण जि.पुणे येथुन स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केली आहे.
तसेच मी व माझे वरील साथीदार व 4) अजय सादिश काळे रा.वाळुंज ता. जि. अहिल्यानगर अशांनी मिळुन बनकुटे ता.पारनेर येथे एका घरामधील इसमांना कु-हाडीची धाक दाखवुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम बळजबरीने चोरी केली आहे. मी व माझे वरील साथीदार नंबर 2 व 3 अशांनी मिळुन सांगवी सुर्या ता. पारनेर येथील घराचे कुलुप तोडुन घरातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरली असल्याचे सांगितले आहे.
सदर घटनेबाबत संबंधीत पोलीस स्टेशनचे अभिलेखाची खात्री केली असता खालील प्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 चाकण जि. पुणे ग्रामिण गु.र.नं. 962/2025 बी.एन.एस. क. 303(2)
2 पारनेर जि. अहिल्यानगर गु.र.नं. 855/2025 बी.एन.एस.क. 310(2)
3 पारनेर जि. अहिल्यानगर गु.र.नं. 870/2025 बी.एन.एस.क. 331(4),305
4 पारनेर जि. अहिल्यानगर गु.र.नं. 882/2025 बी.एन.एस.क. 309(4),331(4),305, 3(5)
आरोपी गणेश रमेश काकडे याचेविरुध्द यापुर्वी पुणे जिल्ह्यामध्ये चोरीचे 5 गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 खेड जि.पुणे ग्रामिण 316/2022 भा.द.वि. क. 379,34
2 खेड जि. पुणे ग्रामिण 315/2022 भा.द.वि. क. 379
3 मंचर जि.पुणे ग्रामिण 8/2020 भा.द.वि. क. 379
4 चाकण जि. पुणे ग्रामिण 1595/2020 भा.द.वि. क. 379,34
5 आळंदी जि. पुणे ग्रामिण 128/2022 भा.द.वि. क. 379,34
ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 882/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 331(4), 305, 3(5) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे