देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 29 डिसेंबर: मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि/श्री किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पो. नि. श्री किरणकुमार कबाडी, स्था.गु.शा. अहिल्यानगर यांनी दिनांक 28/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार ह्रदय, घोडके, शामसुंदर जाधव, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
वर नमुद पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास जामखेड ते नान्नज जाणारे रोडवर चुंबळी गावाचे शिवारातील न्यु रशिका हॉटेल येथे इसम तुषार जगताप हा देशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने नमुद ठिकाणी जावुन छापा टाकुन एक इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे तुषार विठ्ठल जगताप, वय – 32 वर्षे, रा. शिवाजीनगर, जामखेड, ता.जामखेड असे असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची व त्या ठिकाणीची झडती घेता सदर ठिकाणी 44 सिलबंद देशी दारु बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 सिलबंद बाटल्या असा एकुण 1,68,960/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींविरुध्द पोना/1566 श्यामसुंदर अंकुश जाधव यांचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 683/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा