अहिल्यानगर दि. 5 मार्च (प्रतिनिधी )प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि.01/03/2025 रोजी रात्री 01.00 वा.सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे, वय 79, रा.खानापूर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर यांचे बंगल्यामध्ये अज्ञात 6 अनोळखी आरोपीतांनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून, तोंड दाबुन फिर्यादीचे अंगावरील व घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले.याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.102/2025 बीएनएस कलम 310 (2) प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा.पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांना दरोडयाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हयाचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, अरूण मोरे व महादेव लगड अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 05/03/2025 रोजी पथक वर नमूद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे, रा.नगदवाडी, ता.कोपरगाव याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर ते पढेगाव रोडने येणार असलेबाबत माहिती मिळाली. पथक निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना ते बेलापूर – पढेगाव रोडवर मिळून आले.संशयीत इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चाहुल लागल्याने दोन मोटार सायकलवरून 4 इसम पळून गेले.त्याठिकाणी मिळून आलेल्या संशयीत इसमांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांना नाव विचारले असता त्यांची त्यांचे नाव 1) बाळु उर्फ बबलू भास्कर जाधव, वय 32, रा.चांदेकसारे, आनंदवाडी, ता.कोपरगाव 2) मयुर उर्फ सोनु दगडू पवार, वय 25, रा.सावळीविहीर, ता.राहाता 3) सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे, वय 25, रा.नगदवाडी, ता.कोपरगाव 4) सुनिल कडू पवार, वय 26, रा.खानापूर, ता.श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे पळून गेलेले व इतर साथीदारा माहिती विचारली असता त्यांनी पळून गेलेल्या इसमाचे नाव 5) आकाश धनु माळी, रा.नगदवाडी, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर (फरार) व इतर 3 साथीदारांची नावे माहित नसल्याचे सांगीतले.तसेच आमचा एक साथीदार 6) सोहम उर्फ समाधान माळी, रा.कोंची, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर (फरार) या गुन्हयांच्या वेळी त्यांचेसह असलेबाबत माहिती सांगीतली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनिल कडू पवार यांच्या सांगणेवरून खानापूर ता.श्रीरामपूर येथील एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेस धाक दाखवून चोरी केल्याची माहिती सांगीतली आहे.पंचासमक्ष आरोपीतांची अंगझडती घेऊन त्यांचेकडून 4,23,500/- रू किं.त्यात विविध प्रकारच्या धातुच्या मुर्ती, पांढऱ्या धातुचे कॉईन, बांगडी, नाकातील नथ , पांढऱ्या मण्यांचा हार, मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, व मा.श्री.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा