अहिल्यानगर दि. 4 फेब्रुवारी – पद्मशाली समाजाचे विशेष मागास प्रवर्गाच्या व विणकरांच्या विविध मागण्या व समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने नि. जिल्हाधिकारी श्री राजेंद्र पाटील यांना देण्यात आली या वेळी पद्मशाली समाजातील कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, गणेश विद्ये, अमित बुरा, रवि दंडी, ज्ञानेश्वर मंगलारप, तिरमलेश पासकंटी, ऍड. राजू गाली, विनोद बोगा, पुरषोत्तम बुरा, प्रणित अनमल, श्रीनिवास बुरगुल, अमित बिल्ला, रितेश अनमल आदी उपस्थित होते.
विशेष मागास प्रवर्गाचा सदर निवेदन महाराष्ट्रातील पद्मशाली समाज बांधव दिनांक 05 मार्च 2025 पासून पुणे येथील समाज कल्याण विभाग समोर, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ,पुणे येथे साखळी उपोषण व धरणे आंदोलन करीत असून त्यास अहिल्यानगर येथील पद्मशाली समाजाचा जाहीर पाठिंंबा देण्या करीता निवेदन दिले असून पद्मशाली समाजाचे वतीने समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रीकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के स्वतंत्र आरक्षण 2025 च्या सत्रापासुन लागु करावे, विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात 10 आश्रमशाळा सुरू करणे,
विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के राजकीय आरक्षण लागु करावे तसेच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावे,विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनांच्या योजनासाठी एस.बी.सी. व केंद्र शासनाच्या योजनांसाठी ओ.बी.सी. प्रमाण देण्यात यावे,विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावे, एस.बी.सी. कर्मचार्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात यावी,
विणकरांचे प्रश्न सोडविण्या साठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची नियुक्ती करून त्वरीत काम सुरू करावे या सर्व मागण्यानं साठी निवेदन दिले आहे.
वरील प्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास व समस्या न सुटल्यास अहिल्यानगर येथील पदमशाली समाज बांधवांना आमरण उपोषण करणे भाग पडेल असा ईशारा पदमशाली समाजातील समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा