देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 5 मार्च : मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन आरोपीविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली संदिप मुरकुटे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास कर्जत तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेल्या इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 05/03/2026 रोजी पहाटे कर्जत तालुक्यामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत वडगाव तनपुरे गावचे शिवारात भैलुमेवस्ती येथे ता. कर्जत या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन मोकळ्या शेतात झाडाला विनाचारा व पाण्याचे सोय न करता डांबुन ठेवलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीप्रमाणे पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता काही गोवंशीय जतीचे जिवंत जनावरे निर्दयतेने मोकळ्या शेतात झाडाला विनाचारा व पाण्याचे बांधुन ठेवल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर गोवंशीय जनावरांचे मालकी बाबत आजुबाजुला विचारपुस करता सदर गोवंशीय जनावरे हे कोणीतरी अज्ञात इसमाने दोन तीन दिवसापासुन डांबुन ठेवले असल्याची माहिती मिळाली
सदर ठिकाणावरुन 1,35,000/- रुपये किमतीचे 07 गोवंशीय जनावरे, असा एकुण 1,35,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अज्ञात आरोपीविरुध्द कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 84/2026 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5, (अ), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा