देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर -दि. 4 मार्च : अहमदनगर येथील अतिरक्त चिफ ज्युडिशिल मॅजिस्ट्रेट श्रीमती प्रतिभा ए. पाटील यांनी मच्छींद्र नामदेव गायकवाड रा. सावेडी ता. जि. अहमदनगर यांस निगोशिएबल इन्स्ट्रु मेट अॅक्ट कलम १३८ मध्ये दोन वर्षाचा साधा कारावास व तसेच त्यांना रु.२,५०,०००/- आरोपीस दंड केला आहे. सदर दंडाच्या रक्कमेतुन फिर्यादी सी.टी. चिट्स प्रा. लि. शाखा अहमदनगर रु. २,४८,०००/- यांना देण्याचा हुकुम केलेला आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
सी. टी. चिट्स प्रा. लि. शाखा अहमदनगर येथुन मच्छींद्र नामदेव गायकवाड यांनी चिटची [भिशीची] रक्कम घेतलेली होती व तसेच भिशीचा हप्ता नियमितपणे भरणा करणार असे विश्वास दिला होता परंतू आरोपीने भिशीच्या हप्ताची रक्कम थकवली होती. सदर थकीत रक्कमेपोटी आरोपी यांनी रक्कम रुपये रु. २,३७,५००/-चा चेक दिनांक २४/०५/२०२१ रोजीचा फिर्यादी सी टी चिट्स प्रा. लि. यांना दिला होता. त्यानंतर फिर्यादी कंपनीने सदरचा चेक हा त्यांचे खाते असलेल्या अॅक्सिस बँक शाखा सावेडी, अहमदनगर येथे चेक हा वटण्यासाठी भरला असता अकाऊंट क्लोज असा शेरा मारुन चेक न वटता परत आला होता.
आरोपी यांना सदरच्या चेकच्या रक्कमेची मागणी करुन देखील रक्म दिली नाही. त्यामुळे फिर्यादी संस्थेने मच्छींद्र नामदेव गायकवाड रा. सावेडी ता. जि. अहमदनगर ता जि अहमदनगर यांचे विरुध्द निगोशिएबल इन्स्ट्र मेट अॅक्ट कलम १३८ प्रमाणे केस दाखल केली होती. त्यानुसार आरोपीस दोन वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा झालेली आहे. सदर केसमध्ये फिर्यादी संस्थेच्या वतीने माहितगार इसम म्हणुन अशोक तांबे यांनी काम पाहिले तसेच कंपनीचे मॅनेजर विरेद्रसिंग गैर यांनी सहकार्य केले.
फिर्यादी संस्थेतर्फे अॅड. प्रविण मुटकुळे यांनी सक्षमपणे बाजु मांडली. फिर्यादी संस्थेतर्फे एकुण ४ साक्षीदार तपासण्यात आले. या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना संरक्षण मिळेल. तसेच चेक बांऊस प्रकरणी कायदयाचा धाक अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. व अशा प्रकारच्या फसवणुकीस आळा बसण्यास मदत होईल.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा