ब्रेकिंग

मढी घाटात दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद टोळीतील 04 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन गजाआड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर :दि. 8 मार्च :मढी घाटात दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद टोळीतील 04 आरोपीना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या बाबतची विस्तृत माहिती अशी की,
श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले होते.
वरील पथकाने दिनांक 07/03/2025 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मढी यात्रा बंदोबस्त व दरोडा प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील इसम 1) आकाश मोहन डुकरे, 2) विकास दत्तु म्हस्के, हे त्याचे इतर 04 ते 05 साथीदारांसह मढी ते पाथर्डी जाणारे रोडवर मढी घाटामध्ये रोडवर थांबुन सशस्त्र दोरडा घालण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी मढी ते पाथर्डी जाणारे रोडवर मढी घाटामध्ये रोडचे कडेला अंधारात काही इसम संशयीतरित्या हातामध्ये हत्यारे घेवुन उभे असल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन चार इसमांना ताब्यात घेतले व इतर इसम पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) आकाश मोहन डुकरे वय- 26 वर्षे रा. विजयनगर पाथर्डी, जि. अहिल्यानगर, 2) विकास उर्फ सुनिल दत्तु म्हस्के वय- 25 वर्षे रा. माणिक दौंडी चौक पाथर्डी, जि. अहिल्यानगर, 3) अदित्य दिपक बोरकर वय- 23 वर्षे रा. तनपुरे गल्ली राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर, 4) शरद श्रीरंग जाधव वय- 40 वर्षे वागल खेडा ता. अंबड जि.जालना असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना पळुन गेलेल्या इसमाचे नांव गाव विचारले असता त्यांनी काहीएक माहिती सांगितली नाही. नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती व गाडीची झडती घेतली असता, त्यांचे कब्जात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे. रु. 12,000/- किंमतीचे 3 मोबाईल, एक स्क्रु ड्रायव्हर असा एकुण रु. 12,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी आकाश मोहन डुकरे याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर , पुणे, व सातारा जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 पाथर्डी जि. अहिल्यानगर 205/2021 भादवि कलम 143,147,149,302,323,364,504
2
पाथर्डी जि. अहिल्यानगर 451/2023 भादवि कलम 307
3 जेजुरी, पुणे ग्रामिण 198/2019 भादवि कलम 392
4 जेजुरी, पुणे ग्रामिण 200/2019 भादवि कलम 399
5 कराड शहर, जि. सातारा 642/2019 भादवि कलम 392,34
आरोपी  विकास उर्फ सुनिल दत्तु म्हस्के याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 राहुरी जि. अहिल्यानगर 12/2020 भादवि कलम 34,392
2 पाथर्डी जि. अहिल्यानगर 376/2022 भादवि कलम 379
3 देहु रोड पुणे ग्रामिण 393/2022 भादवि कलम 392,34
4 देहु रोड पुणे ग्रामिण 407/2022 भादवि कलम 392,34
आरोपी  अदित्य दिपक बोरकर याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 शिर्डी जि. अहिल्यानगर 355/2025 बी.एन.एस.309(4), 3(5)
2 शिर्डी जि. अहिल्यानगर 356/2025 बी.एन.एस.309(4), 3(5)
3 शिर्डी जि. अहिल्यानगर 359/2025 बी.एन.एस.304(2), 303(2)
4 शिर्डी जि. अहिल्यानगर 360/2025 बी.एन.एस. 304(2), 303(2)
5 शिर्डी जि. अहिल्यानगर 384/2025 बी.एन.एस.309(4), 3(5)
वर नमूद ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पो.ठाणे येथे हजर करुन, यांचेविरुध्द विरूध्द पाथर्डी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 218/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5),310(6) प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पाथर्डी पो.ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे