निधन

फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सर्पमित्र सिद्धांत वाघचौरे यांच्या पत्नी ऐश्वर्या वाघचौरे यांचे अपघाती निधन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर. दि. 8 मार्च : शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले सिद्धांत चंद्रकांत वाघचौरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. ऐश्वर्या सिद्धांत वाघचौरे( वय 30 ) यांचा नेप्तीवरून नगरकडे येत असताना आठ मार्च रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान आयशर गाडीने पाठीमागून त्यांच्या टू व्हीलरला जोराचा धक्का दिल्यामुळे त्यांचा नेप्ती फाटा येथे जागेवर मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी नातेवाईक तसेच मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे त्यांच्या अपघाती जाण्याने नालेगाव परिसरातील व शहरातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या 9 मार्च रोजी सकाळी दहा वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीने व देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे