देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 9 मार्च -प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री स्कुल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. नगरसेविका सौ. विनाताई बोज्जा आणि आरोग्य विभागातील सौ. जयश्री सामलेटी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना वीणा बोज्जा म्हणाल्या आज जागतिक महिला दिन आहे सम्पूर्ण जगात आज महिला दिन म्हणून साजरा करतात परंतु महिला दिन एक दिवस साजरा करून उपयोग नाही तर 365 दिवस महिला दिन म्हणून साजरा करावा, महिले शिवाय कोणतेही कार्य होत नाही परंतु आज काल महिला अत्याचार मोठया प्रमाणात वाढले आहेत या साठी सरकारने हे अत्याचार होऊ नेये म्हणून ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी केली.
यावेळी महिला दिनानिमित्त शाळेतील विदयार्थ्याच्या महिला पालकांना आमंत्रित करून होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये पहिला क्रमांक सौ. भारती कदम, दुसरा क्रमांक सौ. अश्विनी भापासे व तिसरा क्रमांक सौ. सविता खाडे यांनी मिळवला.
या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपले मनोगत सादर करून महिला दीना निमित्त आनंद उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना भाटे व सौ. दिपाली हजारे यांनी केलेतर आभार शाळेच्या मुख्याधपिका सौ. संगीता गांगर्डे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शिक्षिका सौ. अर्चना चव्हाण, सौ. सीमा सोनावणे, सौ. पूजा शिरसाठ, सौ. लीना काळे, सौ. नीलम पवार यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमास महिला पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा