देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 10 फेब्रुवारी (प्रतिनिधी )राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार अतुल लोटके, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
तपास पथक दिनांक 10/02/2025 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोसई/अनंत सालगुडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत हॉटेल मित्रधन, पाथर्डी ते तिसगाव जाणारे रोडवर, पाथर्डी येथे इसम मल्हारी रघुनाथ पालवे, रा.पाथर्डी हा महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदरची माहिती पोनि/संतोष मुटकुळे, पाथर्डी पोलीस स्टेशन यांना दिली.त्यानंतर तपास पथक व पोनि/संतोष मुटकुळे व सपोनि/तांबे व पोलीस अंमलदार नितीन दराडे, बेरड, सय्यद, जाधव नेम.पाथर्डी पोलीस स्टेशन अशांच्या संयुक्त पथक तयार करून छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले.
तपास पथकाने हॉटेल मित्रधन, हॉटेल येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील इसम नामे मल्हारी रघुनाथ पालवे, वय 28, रा.कसबा पेठ, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 20,000/- रूपये किंमतीचा एक मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 21,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मल्हारी रघुनाथ पालवे याचेसह हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये 3 महिला मिळून आल्या.नमूद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी मल्हारी पालवे याने आम्हास वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगुन, ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हास पैस देतात व आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली.नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केलेली आहे.
तपास पथकाने दिनांक 10/02/2025 रोजी 00.50 वा.सुमारास हॉटेल मित्रधन, पाथर्डी येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी मल्हारी रघुनाथ पालवे, वय 28, रा.कसबा पेठ, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर हा स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता 3 महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द मपोकॉ/2120 सारिका नारायण दरेकर, नेम.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 118/2025 स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व सुनिल पाटील, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा