देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर 11 फेब्रुवारी (प्रतिनिधी )आज समाजात अनेक श्रीमंत लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण समाजकार्यासाठी खर्च करण्याची त्यांच्यात दानत नाही. शहानवाज जहागिरदार यांच्यामध्ये समाजकार्यासाठी खर्च करण्याची दानत आहे.
जहागीरदार मित्र परिवार यांच्यावतीने बुरुडगाव रोडवर रविवार दिनांक 9 रोजी एसटी महामंडळ व सिटी बस ग्रुप मधील निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर महानगर पालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले हे बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले शहानवाज जहागिरदार आणि दिलीप शिंदे त्यांचे हा मेळावा आयोजित केल्याबद्दल मनापासुन कौतुक करतो. कारण कर्मचारी सेवेतून निवृत्ती झाल्यानंतर असे मेळावे आयोजित केल्यामुळे एकमेकांची आस्थेने विचारपूस होते, एकमेकांच्या अडचणी समजतात. आम्ही देखील आपल्या माध्यमातून असे मेळावे आयोजित करू आम्हाला आपण मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मेळाव्याचे मुख्य आयोजक इंटकचे माजी जिल्हा उपाअध्यक्ष यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या मेळाव्याचे अध्यक्ष एसटी कामगार काँग्रेस (इंटक ) चे माजी सचिव एन. डी. कासार हे होते. यावेळी कास्टट्राईब संघटनेचे माजी अध्यक्ष मधुकर भावले, एसटी कामगार शिवसेना संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश क्षीरसागर, राज्य परिवहनचे माजी अधीक्षक पेन्टा साहेब, माजी अधीक्षक माने साहेब, इंटकचे माजी अध्यक्ष मुखतार सय्यद, इंटकचे माजी कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, राष्ट्रवादी युनियन चे माजी अध्यक्ष दिनकर लिपाणे, कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष पै. विलासराव चव्हाण, बेरड साहेब, आरपीआय आठवले गटाचे जेष्ठ नेते विजयराव भांबळ, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे,सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले,इंटक जामखेडचे माजी अध्यक्ष प्रदीप शेटे, सुनील भालारे, भारतीय दलित महासंघांचे माजी जिल्हाअध्यक्ष चांदणे, साहेबराव शिरसाठ, चंद्रकांत विधाते, मधुकर बोरकर तसेच मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा निवेदन महेश भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे निमंत्रक इंटक माजी कार्याध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्वानी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा