देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :
अहिल्यानगर दि : 11 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे त्यास मुक्त करून नगर शहरात आणून बसवण्यात यावा.या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते व मनपा आयुक्त यांनी १५ दिवसात पुतळा शहरात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसून आंबेडकरी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड व रीपाई नेते विजयराव भांबळ यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड समवेत रीपाई नेते विजयराव भांबळ, आरपीआय जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड, आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, बामसेफचे शिवाजी भोसले, प्रवीण चाबुकस्वार, देविदास धीवर, उत्तमराव साठे, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, आंबेडकर आरपीआयचे शहराध्यक्ष संदीप वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनीफ शेख, आरपीआयचे सचिव सुजित घंगाळे, वंचित चे शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, सुरेश पानपाटील, पिनू भोसले, संजय शिंदे, अमोल गायकवाड, सुधीर ठोंबरे, हरीश आल्हाट आदीसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अद्यापही डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा स्थापित करण्यासाठी मुख्य वास्तू विशारद मुंबई यांचे ना हरकत व मंजुरीचे पत्र आद्यापही मनपा प्राप्त करू शकले नाही. तसेच चौथ्याऱ्याचे स्ट्रक्चर ऑडिट देखील केलेले नाही. उपोषण काळात मात्र तातडीने प्रांत नगर व कार्यकारी अभियंता व इतर एनओसी घेतल्या गेले. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक आयोजित केली नाही, पुतळा स्थापित झाल्यावर तेथील अनेक अपूर्ण कामे पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप हे ज्या मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण १४ एप्रिल च्या आत करतील परंतु महापालिकेच्या स्तरावर जी दिरंगाई चालू आहे. त्याचा तीव्र निषेध आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे त्यामूळे लवकरात लवकर पुतळे बसवण्यात यावे. अन्यथा मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने सामूहिक आत्मदहन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा