देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुंबई दि.12 – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे; अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभीनेते राहुल सोलापुरकर यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही चुकीचे एकेरी वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.महापुरुषांबद्दल सतत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुरकर यांचा तीव्र निषेध करीत आहोत.त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करून अटक करावी असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
अभिनेते राहुल सोलापुकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक आगऱ्याहुन सुटकेबाबत वक्तव्य करताना अत्यंत अवमानकारक लाच शब्दाचा प्रयोग केल्याबद्दल राहुल सोलापुकरांचा आपण तीव्र धिक्कार करीत आहोत.या वक्तव्यानंतर राहुल सोलापुरकर यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असुन त्या व्हिडीओत राहुल सोलापुकर हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे एकेरी वक्तव्य करीत असल्याचे दिसुन येत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला.विषमतेचे प्रतीक असणाऱ्या ब्राम्हण्यवादाचा,चातुर्वर्णाचा विरोध केला आहे.त्या ब्राम्हण्यवादातुन बाबासाहेबांना ब्राम्हण ठरविण्यचा आटापिटा राहुल सोलापुरकरांनी आपल्या वक्तव्यातुन केला आहे.
त्यामुळे महापुरुषांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुकर यांचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्या प्रकरणी एट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा