देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :पुणे -महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे वतीने पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक श्री ज्ञानेश्वर खिलारी यांना पदमशली समाजाच्या वतीने एस बी सी बाबत शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर केले या शिष्टमंडळात एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्य संघटक आणि पुणे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र कांचानी आणि सचिव किशोर चंदावरकर,तेलंगणा येथील माजी खासदार श्री आनंद भास्कर रापोलू, पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर चे अध्यक्ष श्री संजीवशेठ मंचे , अहिल्यानगर पदमशाली पंचकमिटी चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, देवस्थान चे अध्यक्ष श्री गणेश विद्ये ,श्री नितीन जुजगर, श्री तिरमलेश पासकंटी, श्री विजय रच्चेवार,श्री विलास भाऊ जिंदम , श्री अभिषेक सापा , श्री जयकुमार बैरी, श्री अरुण अमृतवाड , श्रीनिवास सैबी, श्री जगन्नाथ बिन्गेवार, ऍड राजु गाली, पुरषोत्तम बुरा, गणेश चेन्नुर आदी उपस्थित होते.
दिनांक 5 मार्च ते 9 मार्च 2025 पर्यंत एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालया जवळ श्री जितेंद्र कांचानी व सुरेश पद्मशाली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पद्मशाली समाजाच्या वतीने हे धरणे आंदोलन व साखळी उपोषण चालू आहे तसेच सोलापूर, नांदेड,संगमनेर,अहिल्यानगर भिवंडी, मुंबई व इतर शहरातील समाज बांधवांनी त्या त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना एसबीसी आरक्षणाबाबत निवेदन देऊन धरणे आंदोलन एक दिवशीय केले आहे.
सदर साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे येथे 9 मार्च पर्यंत करावयाचे ठरले असल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांनी व एस बी सी मध्ये येत असलेल्या जातीतील समन्व्यकांनी पुणे येथे येऊन आपला सहभाग नोंदवून पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन जितेंद्र कांचनी व सुरेश पद्मशाली यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा