देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : भिंगार :जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. दोन्ही समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर गुंड यांनी महात्मा बसवेश्वराच्या कार्याची व्याख्याने द्वारे महती सांगितली. तसेच यावेळी महात्मा बसवेश्वर न्यूज या नावाने युट्युब चॅनलची सुरुवात करण्यात आली.
भिंगार मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली विशेष म्हणजे याप्रसंगी ब्राह्मण सभा,लिंगायत समाज यांनी संयुक्त भिंगार शहरातील प्रमुख रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली होती.या मिरवणुकीत अनेक स्थानिक समाज बांधव देखील उपस्थित होते स्त्रियांची उपस्थिती उल्लेखनीय होती याप्रसंगी बँड च्या तालावर स्त्रियांनी फेर धरले,फुगड्या खेळल्या. तसेच पुरुषवर्गाने देखील नृत्य केले.
मिरवणुकीच्या अग्रभागी भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे फोटो लावण्यात आले होते. भिंगार येथील रहिवासी यांनी त्याची पूजा केली.सर्व स्तरातील लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीनंतर ज्ञानेश्वर मंदिरात भगवान परशुराम यांची विधिवत पूजा झाली.त्यानंतर महात्मा बसवेश्वर मंदिरात समाजाचे जंगम रमेश स्वामी यांचे हस्ते महात्मा बसवेश्वराची पूजा करण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंट येथील डॉक्टर धनंजय गुंड तसेच उद्योजक शंकरराव रासने व सर्व कार्यकारी मंडळातील सभासदांनी बसवेश्वराची पूजा करून प्रसादचे वाटप करण्यात आले. उपस्थितांना माननीय श्री डॉक्टर गुंड यांनी महात्मा बसवेश्वराच्या कार्याची महती सांगितली.तसेच उपस्थित सर्व समाज बांधवांना आपल्या घरातील तरुण मुला-मुलींना योग्य प्रकारचे वळण लावावे असे सांगितले. यानंतर श्री संजयजी सपकाळ यांचे देखील उपदेश पर भाषण झाले. उपस्थित पैकी श्री शंकरराव रासने यांनी समाजाच्या या कार्याचे कौतुक केले.धार्मिक अध्यात्मिक सेवा सर्वसामान्य लोकापर्यंत महात्मा बसवेश्वराचा संदेश पोहोचवण्याचे कार्य करावे आता कोणीही मागास राहिलेले नाही प्रत्येक समाजात शिक्षित लोक तयार झाले आहेत. याप्रसंगी माजी अध्यक्ष श्री सुभाष हौडगे यांनी बसवेश्वराचे जीवन चरित्र थोडक्यात सांगितले. यावेळी साईराम गारडे यांनी महात्मा बसवेश्वर न्यूज या नावाने युट्युब चॅनल सुरू केलेल्या चॅनेलचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या चॅनलवर आता समाजातील सर्व कार्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे.जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठलराव लोखंडे,प्रकाश तरोडे भागचंद राऊत,माननीय श्री भैय्या गंधे यांची उपस्थिती देखील लाभली. यावेळी कार्यकारणी सदस्य,श्री अप्पासाहेब हंचे, श्री अशोकराव हरके, श्री सुभाष हौडगे,सुरेश उदारे, सतीश नरे,वैभव हेबळे रवींद्र दुगम, बद्रिकेदार उदे,शामराव बोळे, राजाराम मुसळे अजय टकले, प्रकाश भाकरे, विक्रांत कंगे, रवींद्र कंगे, नंदकिशोर कुपाडे,हे देखील उपस्थित.
सर्व उपस्थित महिला व समाज बांधवांनी बसवेश्वराचे दर्शन घेतले.शेवटी अध्यक्ष आप्पासाहेब हंचे यांनी सर्वांचे आभार मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा