देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: मुंबई दि.14 सप्टेंबर ~ आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती ची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुती ने सोडाव्यात असा भाजप कडे रिपब्लिकन पक्षाचा प्रस्ताव देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्षाच्या निश्चित निवडून येतील. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
मुंबई जिल्हानिहाय कार्यकर्ता मेळावे घेऊन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची मोर्चेबांधणीला न.रामदास आठवले यांनी सुरुवात केली आहे.त्यानुसार कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मधील जस्मिन बँकवेट हॉल मध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर सौ सीमाताई आठवले; मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप चे वरिष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर ; माजी खासदार गोपाल शेट्टी ; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजक रिपाइं उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड;
रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;ज्येष्ठ नेते कमलेश यादव; महिला आघाडी मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू; संगीता कपूरे; शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; हरिहर यादव; फादर सुसाई; भीमराव सावतकर; जयंतीभाई गडा; दिलीप व्हावळे; हरिबा कोंडे; संदीप शिंदे; मधुकर गवई; रमेश गौड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष हा डिव्हाईड अँड रुल ची पॉलिसी राबवून समाजात फूट पाडत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे.ते कोणीही बदलू शकत नाही तरी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून समाजात फूट दाण्याचे पाप काँग्रेस करीत आहे.मुस्लिम समाजाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार बद्दल विश्वास बाळगला पाहिजे.त्यांनी काँग्रेस खोट्या प्रचाराला बळी पडू नये.केंद्र सरकार सर्व दलित ओबीसी मुस्लिम सर्व अल्पसंख्यांक सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी समतेच्या दृष्टीने न्याय देण्याचे काम करीत आहे.केंद्राच्या अनेक योजना मुस्लिम समाजाला ही लाभ देत आहेत. संविधानाला मजबूत करण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत असून संविधानाला माथा टेकवून नमन करून मोदींनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मारक देशात उभे केले आहेत.मुंबई इंदुमिल मध्ये उभे रहात असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे जागतिक दर्जाचे स्मारक होणार आहे.त्यासाठी इंदुमिल ची जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तातडीने दिली.त्याचा मी सक्षीदार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र अस्तित्व असणारा पक्ष आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए चा राष्ट्रीय स्तरावर घटक पक्ष आहे.राज्यात महायुतीचा घटक पक्ष आहे.दलित बहुजनांच्या आशीर्वादामुळे रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे.नागालँड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूर मध्ये रिपब्लिकन पक्षाला 17 टक्के मतदान मिळाले आहे त्यामुळे नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यात रिपब्लिकन पक्ष मान्यता प्राप्त पक्ष झाला आहे.आणखी दोन राज्यात मान्यता मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल.त्यामुळे भाजप छोट्या मित्र पक्षांना संपवतो हा आरोप चुकीचा असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी योजनांचे शिबिर आयोजित करावे मी मदत करीन.योजनांचा जनतेला लाभ मिळावा त्यासाठी लागेल ती मदत करण्यास मी आपल्या पाठीशी आहे.राजकारणाच्या पलिकडे जाऊन सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचे काम रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन मुंबई बँकेचे अध्यक्ष भाजप चे वरिष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा