निधन

अभिनेत्री प्रिया मराठे यांचे अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 31ऑगस्ट अभिनेत्री प्रिया मराठे यांचे अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. रविवारची सकाळ मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी ठरली आहे. अभिनय क्षेत्रातील नामांकित अभिनेत्री प्रिया मराठे हिचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगाने तिचे निधन झाल्याचे समजते.
प्रिया गेल्या वर्षभरापासून सोशल मिडिया पासून दूर होती. ती कर्करोगावर उपचार घेत होती व आज तिची प्राणज्योत मावळली. तिने पवित्र रिश्ता, स्वराज्यरक्षक संभाजी, तू तिथे मी अशा अनेक लोकप्रिय मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे