
कर्जत प्रतिनिधी : दि ५ मार्च
कर्जत नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी अभय बोरा आणि रज्जाक झारेकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. यासह पाच समितीच्या सभापती पदाच्या निवडी यावेळी पार पडल्या. याप्रसंगी मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते.
कर्जत नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षाकडून सर्व सामाजिक संघटनेचे दोन शिलेदार असणारे अभय बोरा आणि रज्जाक झारेकरी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी दोन्ही नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांची कर्जत शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. दोन्ही स्वीकृत नगरसेवकांनी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात जात दर्शन घेतले. यासह चार समितीच्या सभापतीपदी निवड देखील पीठासीन अधिकारी डॉ थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, यांच्यासह काँग्रेसचे प्रवीण घुले, युवक काँग्रेसचे सचिन घुले, गटनेते संतोष मेहेत्रे, उपगटनेते सतीश पाटील, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, अमृत काळदाते, भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, ताराबाई कुलथे, छाया शेलार, लंकाबाई खरात, सुवर्णा सुपेकर, मोहिनी पिसाळ, अश्विनी गायकवाड, मोनाली तोटे, ज्योती शेळके, सुनील शेलार, सचिन कुलथे, अमोल भगत, सोशल मीडियाचे मंगेश शिंदे यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
*********- पाच समितीच्या सभापती पुढीलप्रमाणे :
स्थायी समिती : उषा राऊत, महिला व बालकल्याण समिती : ज्योती शेळके, सार्वजनिक बांधकाम समिती : छाया शेलार, आरोग्य स्वच्छता आणि पर्यावरण समिती : रोहिणी घुले, पाणी पुरवठा समिती : भास्कर भैलुमे यांच्या निवडी संपन्न झाल्या. मात्र विरोधीपक्ष नेतेपदी बाबत प्रशासनास विचारले असता त्यांनी ती निवड नगराध्यक्षा करीत असल्याचे म्हंटले.