महिला दिनानिमित्त महिलांसाठी योगासन स्पर्धा

केडगाव प्रतिनीधी
अहमदनगर जिल्हा योग प्रसार संस्था यांच्या मान्यताने श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने महावीर मल्लखांब आणि योगा ट्रेनिंग सेंटर ने महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
महिलांनी नोकरी व घरकामाकडे लक्ष देताना आपल्या शरीराकडे लक्ष देताना योगासने करून उत्तम आरोग्य प्राप्त करावे हा या स्पर्धेचा उद्देश आहे .
ही स्पर्धा रविवार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता मानधना फार्म, महालक्ष्मी उद्यान जवळ, सावेडी, अहमदनगर येथे होणार आहे .
या स्पर्धेकरिता वयोगट १५ ते २० वर्ष , २१ ते २५ वर्ष , २६ ते ३० वर्ष , ३१ ते ४० वर्ष व ४० वर्षांवरील महिला असे आहे.
प्रत्येक वयोगटात ३ बक्षिसे काढण्यात येणार असून अधिक माहितीकरता ९५४५४५९१११ या भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा.
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे आयोजक उमेश झोटींग यांनी केले आहे .