प्रख्यात आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या अर्शदनामा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सि.एस.आर.डी. सभागृहात पार पाडला. लखनऊ विद्यापिठाचे माजी. कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्ष स्थानी पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे होते. या वेळी मंचावर अशोक सब्बन, प्रा.डॉ. महेबूब सय्यद, डॉ. प्रशांत शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात संजय आवटे पुढे म्हणाले, अर्शद शेख व्यवसायाने आर्किटेक्ट असले तरी सोशल आर्किटेक्ट च्या अंगाने त्यांच्या वास्तुशैलीकडे पहायला हवे, पाडणारे हात वाढत चाललेले असताना, बांधाणारे हात या लेखनात दिसतात. पूल बांधणारे हात दिसतात. सगळीकडे अंधारून आलेले असताना आश्वासक काही गवसावे, असे हे लेखन आहे.
अर्शद शेख यांच्या लेखनाला असणारे आधिष्ठान व्यापक आहे. समकालीन संदर्भावर मौन बाळगणे त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते बोलतात, भूमिका घेतात, ठोस मांडणी करतात. सामाजिक हितासाठी व्यापक ध्येयासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली आहे हे जाणवते. व्यवस्थेला प्रश्न विचारताना, ते वास्तवाची चिरफाड करतात. हेतूतः संदर्भ बदलून विपर्यस्त मांडणी होत असलेल्या कालखंडात ‘आयाडिया ऑफ इंडिया’ ची समर्पक मांडणी अर्शद करतात.
राष्ट्रवादाची मांडणी करताना, अत्यंत शास्त्रशुद्धपणे ते मांडत जातात. हिंदू-मुस्लिम एकतेबद्दल मांडणी करताना समाज मनाचा अचूक वेध घेत, उत्तराची वाट प्रशस्त करतात. प्रत्येकाने अर्शदनामा वाचावा असे संजय आवटे यांनी आवर्जुन सांगितले.
माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले अर्शद शेख हे कृतीशिल विचारवंत आहे. व्यवस्था परिर्वतनासाठी काम करणारा कार्यकर्ता, शास्वत आणि पर्यावरणपुरक वास्तुशैलीसाठी प्रयोग करणारा आर्किटेक्ट, अहमदनगरच्या नियोजनबद्ध प्रयत्न कराणारा सजग नागरिक अशी त्यांची अनेक विध रूपे आहेत. त्यातुन त्यांचे लेखन आकार घेत असल्याने त्यात असे वैविध्य स्वाभाविक आहेत. अर्शदनामा मध्ये त्यांनी साकारलेले वैभवशाली अहमदनगर प्रशंसनीय आहेे. अर्शद शेख शास्वत विकासासाठी ’सिव्हील सोसायटीची’ आग्रही भूमिका मांडतात. यालाच अनुसरून आम्ही शहरातील सुज्ञ मंडळींना घेऊन ’अहमदनगर नागरी मंच’ ची स्थापना केली आहे असे डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला चाँद सुलताना हायस्कूलचे माजी प्राचार्य अब्दुल कादिर, शहाशरीफ दर्ग्याचे विश्वस्त निजाम जहागिरदार यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यकम्राचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. महेबूब सय्यद यांनी केले.
कार्यक्रमास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव कॉ. ड. सुभाष लांडे, जेष्ट नेते कॉ. बाबा आरगडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आण्णा सावंत, शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, अब्दुल करीम हुंडेकरी, इंजि. इकबाल सय्यद, आर्किटेक्ट मिनल काळे, गुरदयारसिंग सागु, युनूस तांबटकर, आनंद शितोळे, संध्या मेढे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, विजयसिंह होलम, सुधीर लंके, अशोक निंबाळकर, सॅम्युअल वाघमारे, प्रा. मुदस्सिर सय्यद, संतोष गायकवाड, तुषार सोनवणे, अतुल देठे, उबेद शेख, सुनिल गोसावी, राजेंद्र पवार, गिरीश धोत्रे, समीर आंबेकर, ड. शिवाजी आदमाने, डॉ. विजय कुमठेकर, राम गायकवाड, मोहन इंगळे, बापू चंदनशिवे, आसिफ सर, अतिक शेख, अनिस शेख, अब्दुल रहीम शेख, हबीबखान पठाण, फिरोज तांबटकर, फिरोज पठाण, अफसर मिर्झा, आलमखान आदींसह शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा