कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान!
पाथर्डी दि. 11 (प्रतिनिधी)-पारनेर तालुक्यातील निमगाव वाघा येथील स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा अतिशय मानाचा पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील सुप्रसिद्ध कवी बाळासाहेब कोठुळे यांना प्रसिद्ध उद्योगपती माधवराव लामखडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ग्रामीण साहित्यिक आनंदा साळवे प्रसिद्ध कवी व्याख्याते व पोलीस निवृत्त अधिकारी सुभाष सोनवणे प्रसिद्ध गजलकर रज्जाक शेख व पैलवान नाना डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळाला.
छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावर्षी कवी बाळासाहेब कोठुळे यांच्या साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला गेली 30 वर्ष सातत्यपूर्ण कथा कविता वात्रटिका राजकीय विडंबन चारोळ्या असे लिखाण करून महाराष्ट्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलनापर्यंत त्यांनी आपला प्रवास केला आहे त्यांना आतापर्यंत 57 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत व छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार हा 58 वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉक्टर दत्ता निघावे ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड कवी निलेश दौंड शब्दगंध चे सुनील गोसावी दोस्ती फाउंडेशनचे प्रमुख रज्जाक
शेख कवी बाळासाहेब पवार जनकल्याण फाउंडेशन चे अध्यक्ष पांडुरंग रोडगे तेजस फाउंडेशनच्या अध्यक्ष मेघा डोळस डॉक्टर राजेंद्र फंड शाहीर भारत गाडेकर बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अशोक कानडे कवी आत्माराम शेवाळे प्राचार्य महेश लाडणे सामाजिक कार्यकर्ते हुमायून आतार ज्येष्ठ साहित्यिक देविदास शिंदे कारभारी शिंदे यांनी कवी बाळासाहेब कोठुळे यांचे अभिनंदन केले.