राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामसभेत महिलेला मारहाण करणाऱ्या व दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी
आरपीआयची सहायक पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेऊन केली कारवाईची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- राहुरी तालुक्याच्या टाकळीमिया गावात झालेल्या ग्रामसभेत शिवस्मारकासह इतर राष्ट्रीय महापुरुषांचे स्मारक करावे असा ठराव घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियां (आठवले) महिला आघाडी राहुरी तालुकाध्यक्ष स्नेहलताई सांगळे यांनी केली असता त्यांना गावातील काही समाज कंटकाने शिवीगाळ व मारहाण केली. त्यांचा विनय भंगाचा प्रयत्न केला. आणि तिच्याच पतीवर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करीत या मागणीचे निवेदन सहायक पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना देण्यात आले. तसेच यासमाज कंटकांनविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे. स्नेहलताई सांगळे यांना भविष्यात
यांच्या मार्फत त्रास देण्याची शक्यता आहे. तरी सर्व घटनांची निष्पक्ष चौकशी करून समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी व त्यांना पोलिस संरक्षण द्यावे. समाज कंटकांकडून आर पी आयच्या महिला पदाधिकाऱ्यांना पुढील काळात त्रास दिल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दि. ०७ मार्च रोजी राहुरी येथे आर पी आयच्या वतीने राहुरी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये समाजातील सर्व लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आरपीआयच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, आय टी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, महिला युवती शहर अध्यक्ष वंदनाताई अल्हाट, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे, युवक जिल्हा सरचिटनिस दया गजभिये, युवक नगर तालुका सरचिटनिस निखिल सूर्यवंशी, युवक शहर उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, मयूर केदारे, दीपक थोरात, राहुल वैराळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.