देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 16 डिसेंबर –
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ व १० मधून इच्छुक उमेदवार तथा वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्या समर्थकांची आज प्रभाग क्रमांक १० मध्ये विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीला दोन्ही प्रभागांतील युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी सागर मुर्तडकर यांनी कोणतेही अधिकृत पद नसतानाही नागरिकांच्या हितासाठी केलेल्या विकासकामांचा आढावा मांडला. रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रश्न तसेच दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली. त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत उपस्थित नागरिकांनी यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ व १० मधून सागर मुर्तडकर यांनाच नगरसेवक म्हणून पाहण्याचा निर्धार व्यक्त केला.
विकासाभिमुख व सतत जनतेत राहणारा लोकप्रतिनिधी हवा असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. या बैठकीमुळे प्रभाग क्रमांक ५ व १० मध्ये निवडणूक वातावरणाला वेग आला असून, सागर मुर्तडकर यांना मिळणारा वाढता जनसमर्थन चर्चेचा विषय ठरत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा