धार्मिक

कोरठण खंडोबा ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा!

पारनेर दि. १४ जून (प्रतिनिधी)-लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता पारनेर जि अहमदनगर या राज्यस्तरीय’ ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर सालाबाद प्रमाणे (वटपौर्णिमा) महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पुणे ,नगर ,नाशिक, मुंबई, ठाणे, परिसरातून आलेल्या भाविक भक्तांनी पोर्णिमा पर्वणीत कुलदैवत खंडोबाचे कुळधर्म कुलाचार करून दर्शन घेतले .महिला भक्तांनी वटसावित्री पौर्णिमा व्रत म्हणून मंदिर परिसरातील वटवृक्षाची पूजा करून कुलदैवताचे दर्शन घेऊन आपल्या सौभाग्यासाठी अखंड आशीर्वाद घेतले. सकाळी 6.00वाजता श्री खंडोबा स्वयंभू तांदळा मूर्तीला मंगलस्नान, पुजा होऊन व नंतर साजशृंगार चढवण्यात आला.
सकाळी 7.00वाजता महाअभिषेक पूजा ,आरती श्री अशोक शिंदे व सौ अश्विनी शिंदे (डोंबिवली) पोपट घुले व सौ संगीता घुले, हिराबाई खोसे व कुशाभाऊ खोसे ,मळीभाऊ रांधवण व सौ संगीता रांधवण, यांच्या हस्ते करण्यात आली, याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड, विश्वस्त बन्सी ढोमे, किसन मुंढे, रामदास मुळे, दत्तात्रय खोसे, रामदास शेळके ,हनुमंत सुपेकर इत्यादी उपस्थित होते.
सकाळी 9:30 वाजता श्री खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक ढोल लेझीमच्या तालावर सुरू झाली .भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेऊन खोबरे भंडाऱ्याची उधळण केली येळकोट! येळकोट जय मल्हार गजराने परिसर भारावून गेला होता.सर्वत्र भाविक भक्तांची भक्तिमय मांदियाळी दिसून येत होती,पालखी विसावा घेऊन लंगर तोडणे विधी झाल्यावर अन्नदात्यां कडून पालखीला नैवद्य अर्पण करण्यात आला .पालखी मंदिरात परतल्यावर अन्नदान मंडपात महाप्रसाद देण्यात आला. पोपट देवराम घुले, अशोक शिंदे (डोंबिवली ),बळीभाऊ रांधवण, कुशाबा खोसे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप झाले. देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी ,वाहन पार्किंग व दर्शनबारी नियोजन होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे