
बोधेगाव दि.२- (उद्धव देशमुख)-
उसाचा गोड रस, त्यात चवीनुसार लिंबु- मिठ या अंबट- गोड रसाची नागरिकांमधून उन्हाळ्यात प्रतिक्षा केली जाते, दरम्यान उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेवगाव तालुक्याच्या पुर्व भागातील बोधेगाव बाजारपेठेत रसवंतीच्या चाकाने गती घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. .
उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एका नवीन पेयाचा समावेश होतो, ते म्हणजे उसाचा रस, उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचाव करत नाही तर सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दुर करणे तसेच शरीरात ऊर्जा प्राप्त करून देण्याचे काम करते.ईतर केमिकल युक्त पेयांच्या तुलनेत उसाच्या रसाची मागणी दिवसेंदिवस वाढत आसल्याने बोधेगाव बाजारपेठेत या पेयांची दुकाने हळूहळू थाटु लागली आहेत.
**********
” आयुर्वेदानुसार उसाचा रस आरोग्यास चांगला मानला जातो. कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पोषक तत्वे असतात. या तत्वामुळे तात्काळ उर्जा, शरीरातील पाण्याची कमतरता हाडे तसेच दातांच्या समस्या कमी करण्यास मदत मिळते, परंतु कफाचा त्रास, डायबेटिक पेशंट तसेच वजन कमी करणाऱ्या लोकांनी याचे सेवन करु नये.”
( डॉ. चंद्रशेखर घनवट- साई हॉस्पिटल, बोधेगाव)