अहमदनगर (प्रतिनिधी)- समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त मार्केटयार्ड समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत प्रकाश भागानगरे, माणिक विधाते, सुमेध गायकवाड, अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, सिद्धार्थ आढाव, संजय खामकर, अमित काळे, बाली बांगरे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, नितीन कसबेकर, अण्णासाहेब गायकवाड, सतीश शिरसाठ, सुहास पाटोळे, अँड.संदीप पाखरे, राजा जयस्वाल, प्रमोद आठवाल, बाबा कदम, सृजन भिंगार दिवे, गणेश गायकवाड, संजय दिवटे, शोभा गाडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लवकरात लवकर या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची भावना व्यक्त करत मुंबई येथे झालेल्या २६/११ हल्ल्याचा निषेध करून शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर पुढे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली आहे. घटने मुळे सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली व संविधान एका समाजापुरता नसून सर्व भारतीयांचा असुन संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्रता प्रस्थापित झाली असल्याची भावना व्यक्त केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा