अहिल्यानगर दि. 27 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडूनकीत अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार यांना आस्मान धाकवत 39,650 च्या प्रचंड बहुमताने ही निवडणुक जिंकली. या अनुषंगाने सर्व नगरकरांनी जल्लोष केला त्यांचा विविध संघटना व पक्षांकडून सत्कार करण्यात आला.
नगर कल्याण रोडवरील साईराम सोसायटीच्या वतीने राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व साईराम सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने नुकताच आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेशभाऊ बनसोडे, सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपअध्यक्ष दिनेश शिंदे, सचिव सोमनाथ बोऱ्हाडे, संजय ताकवले,श्रीपद वाघमारे, राजू पंचमुख, ज्ञानेश्वर बिमन, मल्हारी ओव्हाळ, शंकर बोरुडे, अतुल मिसाळ,दत्तात्रय पारखे, आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा