राजकिय

पुढील अडीज वर्षासाठी एससी पुरुष आरक्षण व्हावे , व नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे हे महापौर होवो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना : सुनिल शिंदे

साईराम सामाजिक सोसायटीने केला नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांचा सन्मानचिन्ह देत केला सन्मान!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर,दि. 25 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या, या निवडनुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) व भाजप यांनी युती करत हिंदूधर्म रक्षक आमदार संग्राम भैय्या जगताप व डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या, व अहिल्यानगर शहरातील मतदारानी या युतीला बहुमताचा कौल दिला.
शहरातील प्रभाग क्रमांक 13 च्या निवडणुकीकडे सम्पूर्ण फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. या प्रभागातून सर्व राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे उमेदवार निवडून आले. अनु सूचित जाती पुरुष या प्रवर्गातून सुरेशभाऊ बनसोडे हे विक्रमी मतांनी निवडून आले. यावेळी नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने त्यांचा शाल, सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभ प्रसंगी बोलतांना साईराम सोसायटीचे अध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे म्हणाले,

नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे विक्रमी मतांनी निवडून आले, ही फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीसाठी अभिमानास्पद बाब असून, पुढील अडीज वर्षात अहिल्यानगर महानगर पालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव होऊन सुरेशभाऊ बनसोडे हे महापौर व्हावेत हीच आमची ईश्वराचरणी प्रार्थना आहे.
यावेळी साईराम सामाजिक सोसायटीचे उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, खजिनदार सोमनाथ बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर बिमन, असीरभाई सय्यद, पत्रकार महेश भोसले आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे