देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 25 जानेवारी (प्रतिनिधी)- सथ्था कॉलनी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुरेश भाऊ बनसोडे, अनिता शेटीया, सुजाता पडोळे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, यांचा सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी सुरेश भाऊ बनसोडे म्हणाले की, प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हरितक्रांती करून स्वच्छ सुंदर प्रभाग करणार असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. व म्हणाले की, नगरसेवकांनी आपल्या कामातून विश्वास निर्माण करावा व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. एकाच प्रकारची झाडे न लावता विविध जातींची झाडे लावून त्यांचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. झाडे पुढील पिढी व पशुपक्ष्यांसाठी उपयोगी ठरली पाहिजेत. आम्ही महाराष्ट्रातील ३५ डोंगरांचे नामकरण करून तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. आगडगाव येथे विश्वस्त मंडळाशी संवाद साधून पूजेमध्ये रोप देण्याची संकल्पनाही मांडण्यात आली असून, हे रोप भक्तांनी संगोपन करावे, असा संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाचे एपिसोड महाराष्ट्रभर दाखवण्यात येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी सर्व नवनिर्वाचित राष्ट्रवादी नगरसेवकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, अहिल्यानगर शहरात पुणे-मुंबईच्या धर्तीवर रुंद रस्ते, विद्युत दिवे, उद्याने, क्रीडांगणे व विविध विकासकामे सुरू आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे जिजामाता रुग्णालय उभे राहत असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत त्याचे उद्घाटन होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य नियोजन करण्यात येत असून, येणाऱ्या काळात अधिक गतीने विकासकामे केली जातील असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी राजेंद्र चोपडा, अमोल जाधव, आदेश चंगेडिया, गिरीश अग्रवाल, अमित पोखरणा, महेश मुनोत, विकी जगताप, केतन मुनोत, लालचंद मुनोत, विजू शेठ गुगळे, अनिल पोखरणा, लक्ष्मीभाई सावळा, दीपक अग्रवाल, प्रा. माणिक विधाते, विपुल शेटीया, गोरख पडोळे आदी मान्यवरांसह महात्मा फुले मित्र मंडळाचे पदाधिकारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा