राजकिय

साईराम सामाजिक सोसायटी मधील हा माझा शेवटचा सत्कार, या भागातील प्रश्न सोडवून मी हक्काने तुमच्याकडे सत्काराला येईल : नगरसेवक पै महेशभाऊ लोंढे साईराम सामाजिक सोसायटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर,दि. 24 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले. विजयी नगरसेवकांना मतदारांनी मताच्या रूपाने आशीर्वाद देत आपले प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक म्हणून निवडून दिले.
नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने निर्वाचित नगर सेवकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक महेशभाऊ लोंढे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले,

साईराम सोसायटी मधला हा माझा शेवटचा सत्कार आहे, इथून पुढे येथील वीज,पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन आधी मूलभूत प्रश्न सोडविल्यानंतर मी हक्काने तुमच्याकडे सत्कारासाठी येईल, पुढे बोलतांना ते म्हणाले साईराम सोसायटीच्या नागरिकांना मी माझ्या घराप्रमाणे मानतो, त्यामुळे मी राजकीय भाषण करणार नाही, अशा भावना त्यांनी नागरिकांसमोर व्यक्त केल्या, यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधील नवनिर्वाचित नगरसेवक संजय शेंडगे,महेशभाऊ लोंढे,
नगरसेविका वैशालीताई शाम नळकांडे, रुपालीताई संदीप दातरंगे, प्रभाग 15 चे नगरसेवक विजय गव्हाळे यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी साईराम सामाजिक सोसायटीचे अध्यक्ष सुनिल भाऊ शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, सचिव मछिंद्र महाराज चौकटे, खजिनदार सोमनाथ बोऱ्हाडे, आदींनी आपल्या मनोगतातून साईराम सोसायटीचे मूलभूत प्रश्न उपस्थित नगरसेवकांसमोर मांडले. यावेळी विनोद गायकवाड, संजय मते (सर ), असीरभाई सय्यद, दिगंबर भडकवाड, अण्णा गहिले, संजय अकुबत्तीन,
दिनेश शिंदे, नागेश वाव्हळ, राजू पंचमुख, अतुल मिसाळ, ज्ञानेश्वर बिमन, असीर सय्यद, उमेश क्षीरसागर, शंकर बोरुडे, प्रदीप डागवाले, श्रीराम बालाजी, कृष्णा तावरे, सुनिताताई शिंदे, राखी मते मॅडम तसेच साईराम सोसायटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार महेश भोसले यांनी केले तर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी साईराम सामाजिक सोसायटीचे खजिनदार सोमनाथ बोऱ्हाडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे