सामाजिक

निंबोडी गावठाणच्या विजेचाप्रश्न मिटेपर्यंत गावकरी लाईट बिल भरणार नाहीत- प्रकाश पोटे. निंबोडी ग्रामस्थांचा महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या..

अहमदनगर दि.8 ऑक्टोबर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे. निंबोडी हे गाव, नगर शहरापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील गावठाण डी.पी.वर आवश्यक विज भाराव्यतिरिक्त जवळ्पास तिन पटचा अधिक भार असल्याने ती वारंवार जळते. अनेक वेळा विज गावठाण भागात डीम स्वरूपात असते. महिन्यातून दोन ते तीन वेळा सदरचा ट्रान्सफॉर्मर बदलावा लागतो. या विषयी वारंवार कळवल्यानंतर गावातील डिफेन्स कॉलनी परिसरात नवीन ट्रांसफार्मर सुरू करून पंधरा दिवस झालेले आहेत. तरीही गावातील गावठाण परिसरातील विजेचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला नसल्याने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शिवाजी बेरड, बापूराव बेरड, सुनील पानसरे, अशोक पवार, विनोद घोगरे, दत्तू कळसकर, दिलीप आवारे, भास्कर शेंडगे, विनोद साळवे, अकबर शेख, रवींद्र पवळ, भरत शेडाळे, प्रवीण रहाणे, दासा माळी, विनोद शेंडगे, दीपक बनकर, तात्याभाऊ बनकर, मेजर ज्ञानेश्वर बनकर आदी उपस्थित होते.
दैनंदिन जीवनातील कुठलंही काम हे विजे विना करणं शक्य नाही. तसंच गावातील जास्तीत जास्त लोक हे वीज बिल देखील वेळेवर भरत आहेत. परंतु केवळ आपल्या विभागाचा वेळ काढूनपणा आणि चुकीचे नियोजन यामुळे गावकरी हैराण झालेले आहेत. आज गावकऱ्यांसह येऊन निदर्शन करण्यात आले. जोपर्यंत विद्युत पुरवठा संपूर्ण गावठाण परिसरात सुरळीत होत नाही, तो पर्यंत गावठाण मधील गावकरी कुठल्याही स्वरूपाचे बिल भरणार नाही, तसेच यादरम्यान आपण कुठल्याही गावठाणातील घराचे वीज कनेक्शन, विज बिल अभावी कट केल्यास पुन्हा विद्युत महावितरणाच्या कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे