श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर ता भुदरगड जि.कोल्हापूर संचालित श्री संत बाळूमामा मेंढी माऊली पालखी सोहळा दि.१० ऑक्टोबर रोजी घारगाव येथुन प्रस्थान होऊन श्रीगोंदा शहरामध्ये औटेवाडी येथे आगमन होत आहे.दररोज सकाळी आणि सायं 9 महाआरती व महाप्रसाद होईल. श्रीगोंदा शहरामध्ये १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार जगाच्या मालकाचा भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा पालखी क्रमांक 1 ने आयोजीत केलेला असून विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.१४.१०.२०२४ रोजी भागवत एकादशी निम्मित बाळूमामांचा हरी जागर होणार आहे .मंगळवार दि १५.१०.२०२४ रोजी पहाटे ४ वाजता श्रींचा दुग्ध महाभिषेक होईल सकाळी ९ वाजता श्रींची महाआरती नंतर दुपारी २ ते ४:२० पर्यंत ह.भ.प.गुरुवर्य संजीवनीताई शिंगाडे नातेपुते माळशिरस यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर ठीक ४:२३ मि. बाळूमामा जन्मोत्सव सोहळा, पुष्पवृष्टी त्यानंतर पाळणा गायला जाईल. दु. ४:३० वा बाळूमामांची महाआरती व नंतर महाप्रसाद होईल.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
श्री बाळूमामा देवालय (ट्रस्ट) सर्व विश्वस्थ मंडळ व सर्व ग्रामस्थ आदमापूर यांची असणार आहे.पालखीचे कारभारी गुंडोपंत पाटील, उपकारभारी विठ्ठलभाऊ पांडूळे तसेच संयोजक औटेवाडी,औटेवस्ती, हिरडेवाडी, सप्रेमळा, म्हेत्रेमळा, खेतमाळीस मळा, दांडेकर मळा श्रीगोंदा शहर आयोजकांच्या वतीने सदर जन्मोत्सव सोहळ्यास सर्व महिला पुरुष, लहान थोर भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा