भोसे-चखालेवाडी येथील श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदगुरु मनोहर मामा यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा!

भोसे दि.२१ जून (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील भोसे-चखालेवाडी येथील श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदगुरु मनोहर मामा यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
आधुनिक काळातही आपले जीवन जगण्यासाठी मानवाला ज्यांचे विचार तारक आहेत. तसेच संकटातून मार्ग काढण्यासाठी ज्यांच्या विचारातूनच मार्गदर्शन मिळत राहते अशा सद्गुरूंचा वाढदिवस नेहमी चांगले दिवस पाहण्यासाठी
वाईट दिवसांचा सामना करावा लागतो याची शिकवण देणारा असून कर्जतच्या स्नेहप्रेम संस्थेतील गरजूवंत विद्यार्थ्यांसोबत केक कापून साजरा करण्याचा योग आला याचे समाधान वाटले असे प्रतिपादन दिगंबर ढोले यांनी केले.
यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने स्नेहप्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना अल्पोहार आणि मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी ॲड. अभय भोस यांनी भोळ्याभाबड्या आणि गोरगरीब जनतेला सदैव ईश्वरभक्तीची वाट दाखवणारे संत श्री बाळूमामा यांच्या अलौकिक कार्यांची तसेच श्री सदगुरु मनोहर मामा यांच्या अध्यात्मिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी दीपक लांगोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहप्रेमचे फारूक बेग यांनी केले तर आभार संचालिका स्वाती ढवळे यांनी मानले. या प्रसंगी वैभव हराळ, सिद्धार्थ कांबळे, ओम जगदाळे, डॉ राजेंद्र डाळिंबे, सुमित खेतमाळीस, महेश कन्हेरे यांच्यासह पत्रकार डॉ अफरोजखान पठाण, सुभाष माळवे, मुन्ना पठाण आणि मोतीराम शिंदे उपस्थित होते.