पोलीस परेड मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

अहमदनगर दि.21 जून
(प्रतिनिधी) : जगभरात दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस कार्यालय, जिल्हा क्रिडा कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड ग्राउंड येथे 9 व्या आंतरराष्ट्रिय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
योग दिनाच्या कार्यक्रमात कर्मयोगी योगा स्टुडिओ येथील योगा थेरेपिस्ट गायत्री गारडे, योग अभ्यासक श्रीराम दिवटे, योग प्रशिक्षण गणेश कुलथे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना योग अभ्यासाचे महत्व सांगितले. त्यानंतर शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी कर्मचा-याचा-यांनी योग वर्गात सहभाग घेतला. एक तास चाललेल्या या योग वर्गात उपस्थितांनी प्राणायाम, ताडासन, भद्रासन, वज्रासन, भुजांगसन, सेतूभद्रासन, कपाल भाती यादी प्रकारची आसने केली. या योग वर्गानंतर जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांचे सोबत उपस्थितांनी योग करण्याबाबत संकल्पाचे वाचन केले. या कार्यक्रमास जिल्हा प्रशासन, पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.