सामाजिक

“संविधान बचाव देश बचाओ” मोर्चा. आंबेडकरवादी बहुजन पुरोगामी जनतेच्या वतीने शहरात होणाऱ्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा! चिथावणी खोर व प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्याना अटक करून शहरात बाहेरून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना रोखण्याची मागणी!

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात बेरोजगारी वाढली असून महागाईने कळस गाठला आहे. सर्वसामान्य गोरगरीब माणूस महागाई मध्ये होरपळला जात आहे. पूर, गारपीट या निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी पूर्णत कोलमडून गेलेला आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या केलेल्या घोषणा हवेत विसरून गेल्या आहेत. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. कुटुंबाचे उपजीविकेचे साधन हातात उरलेले नसून त्याला रोजगार देण्याऐवजी त्यांच्या डोक्यात धर्मा धर्मा मधील जातीयवाद घालून मूळ प्रश्नाला जाणीवपूर्वक बगल दिली जात आहे. त्यामुळे 17 ते 21 वयोगटातील तरुण मुले याचे बळी पडून पोलिसांच्या केसेस पदरी घेऊन तरुण पिढी बरबाद होत आहे. भारतीय संविधानाची पद्धतशीरपणे चिरफाड करून लोकशाही नस्तनाबूत करण्याचे केंद्र व राज्य सरकारचे षडयंत्र चालू असून. समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने त्याचा तीव्र निषेध करत असून देशातील स्वायत्त संस्था त्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपून केंद्र सरकारच्या बटीक बनल्या आहेत. तसेच हे सरकार इ.डी, सीबीआय या विविध यंत्रणाची भीती दाखवण्यासाठी व प्रत्यक्षात गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे. देशात धार्मिक दंगली होऊन देशाचे विघटन व्हावे यासाठी राजकीय संघटना व संस्था वेगाने काम करीत आहे. देशाची एकात्मता अखंडता धर्मनिरपेक्षता धोक्यात येते की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. या सर्व परिणामाचा परिपाक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात व शहरात याचे दृश्य परिणाम दिसत आहे. या गोष्टींना पायबंध घालावा समाज विघातक शक्तीवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे भाषणे करून दंगली घडवण्यात यासाठी प्रयत्न करतात यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी पोलीस व इतर प्रशासनातील अधिकारी आपले नोकर आहेत या भावनेने शिवीगाळ व व्यर्थाच्या भाषेत टीका करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे तसेच नगर शहरात व जिल्ह्यात भाजप पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी येऊन व्यक्तिगत भांडणाला धार्मिक स्वरूप देऊन अव्यर्थच्या भाषेत शिवीगाळ केली. दोन धर्मात दंगल होईल असे वक्तव्य केले. व अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना व पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटीची भाषा वापरली गृहमंत्री व पालकमंत्री आमच्या पक्षाचे आहेत त्यामुळे आम्ही काहीही करू शकतो अशी मुजोरीची भाषा वापरली उत्तर प्रदेशात अतिक अहमद ची जशी हत्या केली तशी महाराष्ट्रातही करू शकतो ही चितावणीखोर व प्रक्षोभक भाषा वापरून वातावरण दूषित केल्याने नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा व नगर जिल्हा व शहरात जातीय किंवा धार्मिक विद्रेस निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यात व शहरात येण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात यावा या विविध मागणीसाठी समस्त रिपब्लिकन व बहुजन प्रोग्रामिंग समाजाच्या वतीने “संविधान बचाव देश बचाव” हे ब्रीद वाक्य म्हणून मोर्चा काढण्यात आला यावेळी बहुजन ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, रिपाई आठवले गटाचे अजय साळवे, पी आर पी कवाडे गटाचे सुमेध गायकवाड, किरण दाभाडे ,रोहित आव्हाड, अनंत लोखंडे, भैरवनाथ वाकळे, योगेश थोरात, संजय खामकर, योगेश साठे, संतोष गायकवाड, रवी सातपुते, महेबूब सय्यद, अर्षद शेख, दीपक पापडेजा, संतोष जाधव, सोमा शिंदे, विजय गायकवाड, संदीप वाघमारे, विनोद भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, जयाताई गायकवाड, सचिन शेलार, सिद्धार्थ आढाव, संध्या मेढे, अंकुश मोहिते, जयाताई गायकवाड आदीसह रिपब्लिकन व बहुजन प्रोग्रामी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे