आमचं एकच ध्यास श्री क्षेत्र कानिफनाथ गडाचा विकास,,, अध्यक्ष बबनराव मरकड

पाथर्डी( प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड हा भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे,या देवस्थानचा नुकतेच नवनिर्वाचित श्री बबनराव मरकड यांची अध्यक्षपदी निवड झाली, तसेच जागतिक पत्रकार दिनानिमित्त श्री क्षेत्र कानिफनाथ ट्रस्टच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले,या वेळी बोलताना अध्यक्ष बबनराव मरकड म्हणाले की आमचा एकच ध्यास आहे की गडाचा विकास,या ठिकाणी जगभरातील भाविक दर्शनासाठी येतात, सर्वांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, भाविकांसाठी रहाण्याची व्यवस्था पाण्याची सोय, तसेच पर्यटकांसाठी भव्यदिव्य असे गार्डन करण्यात येणार आहे, पावसामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे अस्वासन दिले , तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,या कार्यक्रमासाठी,सुनिलजी नजन , वजीर शेख, अमोल म्हस्के, हरिहर गर्जे ,राजेंद्रजी सावंत, संदिप शेवाळे , बाबासाहेब गर्जे , अमोल कांकरिया, नितीन गटाणी ,अजय गांधी , नारायण पालवे , शिवदास मरकड , या सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव मरकड, सहसचिव ॲ,शिवजीत डोके , कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड , विश्वस्त रविंद्रजी आरोळे , शामराव मरकड , डॉक्टर विलास मढीकर , व्यवस्थापक संजय मरकड ,वह अदी, मान्यवर उपस्थित होते.